गुन्हा दाखल केल्यानंतर आठवड्याभरातच नीरव मोदीने भारतीय बँकेतून काढली मोठी रक्कम

गुन्हा दाखल केल्यानंतर आठवड्याभरातच नीरव मोदीने भारतीय बँकेतून काढली मोठी रक्कम

सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतरही नीरव मोदीनं भारतीय बँकेच्या शाखेतून मोठी रक्कम काढल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिली आहे.

  • Share this:

30 मार्च : 11 हजार 500 कोटींचा पीएनबी घोटाळा करणारा प्रसिद्ध हिराव्यापारी नीरव मोदीसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानंतरही नीरव मोदीनं भारतीय बँकेच्या शाखेतून मोठी रक्कम काढल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या सुत्रांनी दिली आहे. सीबीआयनं पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर अगदी एकाच आठवड्यानंतरच बेल्जियममधील अँटवर्प सिटीमधील एका भारतीय शासकीय बँकेच्या शाखेतून नीरव मोदीनं मोठी रक्कम घेतली होती.

नीरव मोदीबद्दलची ही धक्कादायक माहित सगळ्यांनाच हादरवून टाकणारी आहे कारण, 31 जानेवारी 2018 रोजी भारतीय बँकांच्या सर्व विदेशी शाखांना याबद्दल सतर्क केले गेले होते. याच तारखेला सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन संस्थेने नीरव मोदी, त्याचा भाऊ निशल मोदी आणि त्याची पत्नी अम्मी मोदी, त्याचबरोबर मेहूल चोकसी विरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. पण मग असं असतानाही मोठ्या प्रमाणात रक्कम कशी काढली गेली याचा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे.

दरम्यान, नीरव मोदीसह या सर्वांचे बँक अकाऊंट सिल करण्यात आले होतं, मात्र त्यानंतरही एवढी मोठी रक्कम बेल्जिअमधून काढली गेल्यानं तपास यंत्रणांसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे. आता यावर तपास यंत्रणा कशी आणि काय कारवाई करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2018 10:29 AM IST

ताज्या बातम्या