News18 Lokmat

चीनला पोचल्यावर पंतप्रधानांनी साधला तिथल्या भारतीयांशी संवाद

तिथे ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान शियामेन शहरात ब्रिक्स देशांची परिषद पार पडतेय. डोकलामचा वाद मिटल्यावर मोदी पहिल्यांदाच चीनला गेलेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2017 09:29 PM IST

चीनला पोचल्यावर पंतप्रधानांनी साधला तिथल्या भारतीयांशी संवाद

03 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी चीनला पोचले.  तिथे गेल्यावर तिथल्या भारतीयांशी त्यांनी बातचीत केली. लहान मुलांबरोबरही संवाद साधला.

नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला, आणि पंतप्रधान मोदी चीनसाठी रवाना झाले. तिथे ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान शियामेन शहरात ब्रिक्स देशांची परिषद पार पडतेय. डोकलामचा वाद मिटल्यावर मोदी पहिल्यांदाच चीनला गेलेत. आता शी जिनपिंग यांच्याशी होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेतून काही निघतं का ते पाहायचं. याच कारणामुळे अमेरिकेचंही या बैठकीवर बारीक लक्ष असणार आहे.

Loading...

जिनपिंग व्यतिरिक्त मोदी रशियाचे अध्यक्ष व्हादीमिर पुतिन यांच्याशीही चर्चा करतील. इजिप्त आणि ब्राझिलचे अध्यक्षही त्यांना भेटतील. चीनमधून  ५ तारखेला निघाल्यावर ते म्यानमारला जाणार आहेत. तिथे ते स्टेट काऊंसेलर आँ सा सू की यांची भेट घेतील. म्यानमारच्या नेत्यांशी ते रोहिंग्या मुसलमानांच्या मुद्द्यावरही चर्चा करणार आहेत.

३ दिवस पंतप्रधान म्यानमारमध्ये असणार आहेत. रंगून हा त्यांच्या दौऱ्यातला शेवटचा टप्पा असेल. ७ तारखेला ते भारतात परततील. मोदींचा हा ५९वा परदेश दौरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2017 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...