70 वर्षांनंतर इस्रायल दौऱ्याचा आनंद आहे आणि प्रश्नचिन्हही-पंतप्रधान

70 वर्षांनंतर इस्रायल दौऱ्याचा आनंद आहे आणि प्रश्नचिन्हही-पंतप्रधान

इस्त्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथील स्थानिक भारतीयांशी संवाद साधला.

  • Share this:

05 जुलै : इस्रायल आणि भारताची ही भेट ऐतिहासिक आहे. या भेटीसाठी तब्बल 70 वर्षं लागले अशी खंत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलकरांचे आभार मानले. भारत आणि इस्त्रायलचे संबंध असेच कायम राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेथील स्थानिक भारतीयांशी संवाद साधला. तेल अवीवमध्ये कनवेंशन सेंटरमध्ये चार हजार भारतीयांशी मोदींनी संवाद साधला. आपल्या भाषणाची सुरुवात मोदींनी हिब्रुतून केली. भारतात केल्या विकासकामांचा मोदींनी पाढा वाचला. तसंच इस्त्रायलमध्ये मिळालेल्या आदरतिथ्याचे मोदींनी मोठ्या मनाने आभार मानले. या भाषणात मोदी मराठी मायबोलीचाही उल्लेख केला. मायबोली नावाचं मासिक इस्रायलमध्ये प्रकाशित होतं.

आपल्या कार्यकाळात नियमावलीत सुसूत्रता आणल्याचं सांगून मोदी पुढं म्हणाले की, 'विद्यमान सरकारने विमा क्षेत्रात परकीय गुतंवणुकीची मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना लहानसहान गोष्टींसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागत नाही. तसेच जर एखाद्या तरुणाला स्टार्टअप सुरु करायचं असेल, तर तो एका दिवसात नोंदणी करुन आपला उद्योग सुरु करु शकतो.'

प्रत्येक भारतीयाला घर देण्याबद्दल  मोदी म्हणाले, '2022 मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे. यासाठी 2022 पर्यंत आम्ही भारतातील सर्व गरीबांना घरं देणार आहेत. त्यासोबतच वीज आणि पाणी यासारख्या सुविधाही उपलब्ध करुन देण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे.”

First published: July 5, 2017, 11:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading