S M L

गेल्या 17 वर्षात 15 मिनिटंही सुटी घेतली नाही - नरेंद्र मोदी

पंतप्रधान म्हणले सिंगापूर हे बदलत्या जगाचं प्रतिक आहे. इथे फक्त इनोव्हेशनच होतं असं नाही तर नव्या जगाचीही निर्मिती होते.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 1, 2018 08:18 PM IST

गेल्या 17 वर्षात 15 मिनिटंही सुटी घेतली नाही - नरेंद्र मोदी

सिंगापूर,ता.01 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी सिंगापूरमधंल्या नानयांग टेक्निकल विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणले सिंगापूर हे बदलत्या जगाचं प्रतिक आहे. इथे फक्त इनोव्हेशनच होतं असं नाही तर नव्या जगाचीही निर्मिती होते.

कठिण परिश्रम आणि नव्या गोष्टींचा ध्यास असेल तरच काही नवं निर्माण होऊ शकतं. भारतातही अशा बदलाला सुरूवात झाली असून बदल घडवण्यासाठी सर्व देशवासियांना सोबत घेऊन आपण काम करत असल्याचं पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितलं.

2001 पासून आपण सार्वजनिक जिवनात असून गेल्या 17 वर्षात 15 मिनिटेही आपण सुटी घेतली नाही असं ते म्हणाले. देशातली सामान्य जनताच ही माझी प्रेरणा आहे. उन्ह, पाऊस, हवा, बर्फ झेलत सीमेवर काम करणारे जवान, आपल्या मुलांसाठी शेतात राबणाऱ्या माता भगिनींकडे पाहिलं की मला झोपण्याचा अधिकार नाही असं वाटतं.

त्यामुळं मी न थकता काम करतो आणि स्वत:ला फिट ठेवतो. ऐकविसावं शतक हे आशियाचं आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 08:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close