S M L

नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, अयोध्या-जनकपुर बस सेवेचं करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. चार वर्षांत ते तिसऱ्यांदा नेपाळला गेले आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: May 11, 2018 09:16 AM IST

नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, अयोध्या-जनकपुर बस सेवेचं करणार उद्घाटन

11 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. चार वर्षांत ते तिसऱ्यांदा नेपाळला गेले आहेत. जनकपूरच्या एअरपोर्टहून ते थेट जानकी मंदिरात जाणार आहेत. इथे ते साधारण पाऊण तास पूजादेखील करतील. मोदी जनकपूरमध्ये असेपर्यंत एकाही विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

यानंतर नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान केपी ओली एकित्रित रामायण सर्किटचं उद्घाटन करतील. या दौऱ्यात पंतप्रधान

अयोध्या-जनकपुर बस सेवेचा शुभारंभ करणार आहेत.

पाहूयात मोदींचा आजचा कार्यक्रम कसा असणार आहे ते...

- स. 10:00 - जनकपूर येथे आगमन

Loading...
Loading...

- स. 10:20 जानकी मंदिराला भेट, रामायणा सर्किट आणि जनकपूर-अयोध्या बसचं उद्घाटन

- स. 11:10 - बाराबिघामध्ये भाषण

- दु. 12:10 - जनकपूरहून प्रस्थान

- सं. 6:30 - मोदी आणि नेपाळचे पीएम ओली यांच्यात बैठक

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2018 09:16 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close