जादू की झप्पी : जागतिक नेत्यांना भेटण्याची ही आहे खास 'मोदी स्टाईल'!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटण्याची आणि बोलण्याची एक खास स्टाईल आहे. जगभरात ते कुठेही गेलेत तरी त्यांचा अंदाच तोच असतो. फारशा औपचारिकतेत न पडता ते जागतिक नेत्यांशी खुलेपणाने संवाद साधतात आणि गळाभेटही घेतात. यावरून त्यांच्यावर टीकाही होत असते.

  • Share this:

युवराज सलमान यांचं मंगळवारी रात्री भरातात आगमन झालं होतं. पंतप्रधा नरेंद्र मोदी राजशिष्टाचार बाजूला ठेवून सलमान यांचं स्वागत करायला विमानतळावर गेले होते. मोदीची युवराज सलमान यांचं गळाभेट घेऊन स्वागत केलं.

गुजरातमध्ये झालेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शावकत मिरजीयोयेव यांचं गळाभेट घेऊन स्वागत करताना पंतप्रधान मोदी.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना व्दिपक्षीय परिषद झाल्यानंतर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची आपल्या खास स्टाईलने भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

एका जागतिक परिषदेदरम्यान भारताचा दीर्घकालीन मित्र असलेला रशीयाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं मोदींनी असं स्वागत केल आणि ख्याली खुशाली विचारली.

भारत भेटीवर आलेले तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैयप एर्दोआन यांचं स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

अबू धाबी के क्राउन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायेद अल नहयान यांचं दिल्लीतल्या हायदरबाद हाऊस इथं स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

मेक्सिको दौऱ्यावर असताना राष्ट्रपति एनरिक पेना नीटो यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी भेट घेतली आणि अभिवादन केलं.

भारत भेटीवर आलेले फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी चंदिगडमधल्या रॉक गार्डनला भेट दिली होती. त्यावेळी त्यांचं पंतप्रधानांनी असं स्वागत केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात खास केमेस्ट्री होती. ओबामा भारत भेटीवर आले असताना मोदींनी त्यांचा उल्लेख माझे खास मित्र बराक असा केला होता.

सोशल मीडियावर कमालीते सक्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभर फॉलोअर्स आहेत. अमेरिका भेटीत त्यांनी आवर्जुन फेसबुकच्या मुख्यालयाला भेट दिली आणि मार्क झुकरबर्गसहीत फेसबुकच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या