डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील कारवाईचा पंतप्रधान मोदींना फायदा, ‘या’ क्षेत्रात झाले नंबर 1!

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील कारवाईचा पंतप्रधान मोदींना फायदा, ‘या’ क्षेत्रात झाले नंबर 1!

ट्विटरने (Twitter) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. ट्विटरनं केलेल्या या कारवाईचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी :  अमेरिकन (US) संसद कॅपिटॉल हिलवर (Capitol Hill) ट्रम्प समर्थकांनी बुधवारी हल्ला केला होता.  या हल्ल्यानंतर ट्विटरने (Twitter) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. ट्विटरनं केलेल्या या कारवाईचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना झाला आहे.

मोदी नंबर 1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 64.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर ट्रम्प यांचे 88.7 दशलक्ष फॉलोअर्स होते. मात्र आता ट्रम्प यांचं अकाऊंद बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे सर्वात जास्त फॉलोअर्स असणारे सक्रीय राजकारणी बनले आहेत. वास्तविक अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barak Obama) यांचे ट्विटरवर 127.9 दक्षलक्ष फॉलोअर्स आहेत, मात्र ते आता राजकाराणात जास्त सक्रीय नाहीत. अमेरिकेचे भावी अध्यक्ष जो बायडन ( Jo Biden) यांचे 23.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे सध्या 24.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या 21.2 दशलक्ष आहे.

ट्रम्प यांच्यावर कारवाई का?

ट्रम्प समर्थकांनी बुधवारी केलेल्या हिंसाचाराची शिक्षा ट्रम्प यांनाही मिळू लागली आहे. हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते. परंतु आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. ट्विटरसह डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद करण्यात आलं आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधीपर्यंत, डोनाल्ड ट्रम्प फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार नाहीत. बायडन 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.

हे ही वाचा-विहिरीत 8 फुटी धामण...कठड्यावर आत्महत्येच्या तयारीत होता तरुण; गावकरी आले पण..

इतकंच नाही तर ट्रम्प यांना 20 जानेवारीपर्यंतही अध्यक्षपदी राहू देऊ नये. त्यापूर्वीच त्यांना पदावरुन हटवण्यात यावं अशी मागणी काही खासदारांनी केली आहे. अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या स्पिकर नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी ट्रम्प यांच्या जवळ असलेल्या न्यूक्लिअर कोडबद्दल (Nuclear Code) चिंता व्यक्त केली आहे. या विषयावर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संसद सदस्यांना पत्र लिहिलं आहे.

Published by: News18 Desk
First published: January 10, 2021, 5:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading