• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • खास भेटवस्तू घेऊन अमेरिकेला पोहोचले पंतप्रधान मोदी, कमला हॅरिस यांना भेट म्हणून दिली आजोबांची आठवण

खास भेटवस्तू घेऊन अमेरिकेला पोहोचले पंतप्रधान मोदी, कमला हॅरिस यांना भेट म्हणून दिली आजोबांची आठवण

सगळ्या व्यस्त बैठकांमध्येही पीएम मोदींच्या कार्यक्रमात राष्ट्रप्रमुखांना विशेष भेटवस्तू देण्याचाही समावेश केला जातो.

 • Share this:
  वॉश्गिंटन, 24 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका (USA) दौऱ्यावर आहेत. कोरोनाव्हायरस (Corona Virus) महामारीला सुरुवात झाल्यापासून पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यात ते क्वाड (QUAD) गटातील सदस्य देशांना भेटतील. विशेष गोष्ट म्हणजे सगळ्या व्यस्त बैठकांमध्येही पीएम मोदींच्या कार्यक्रमात राष्ट्रप्रमुखांना विशेष भेटवस्तू देण्याचाही समावेश केला जातो. शुक्रवारी त्यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना विशेष भेटवस्तू (Gifts) दिल्या. पंतप्रधान मोदींचा गुरुवार, 23 सप्टेंबरला सुरू झालेला अमेरिका दौरा 25 सप्टेंबरपर्यंत आहे. पहिल्या दिवशी दिग्गज कंपन्यांच्या 5 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सुरू झालेल्या पंतप्रधानांच्या चर्चेची फेरी शुक्रवारपर्यंत सुरू राहील. यानंतर मोदी जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड ग्रुपच्या सदस्य देशांसोबत दीर्घ बैठक घेईल. शेवटी शनिवारी, पीएम मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतील आणि रविवारी नवी दिल्लीला रवाना होतील. हेही वाचा- आसाम धुमसलं, पोलिसांचा ग्रामस्थांवर गोळीबार; दोन जणांचा मृत्यू पीएम मोदींनी उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांना त्यांचे आजोबा श्री. पीव्ही गोपालन यांच्याशी संबंधित काही जुन्या माहितीच्या प्रती दिल्या. या विशेष प्रती हस्तकलेच्या चौकटीत सजवलेल्या होत्या. श्री गोपालन हे एक वरिष्ठ आणि आदरणीय सरकारी अधिकारी होते, ज्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. याशिवाय पंतप्रधानांनी हॅरिस यांना गुलाबी मीनाकारी बुद्धिबळाचा सेट भेट दिला. गुलाबी मीनाकारी हे शिल्प (कला) जगभरातील सर्वात जुन्या शहरांपैकी असलेलं एक काशीच्या जवळचं आहे. हे पंतप्रधान मोदींचं क्षेत्र देखील आहे. या बुद्धिबळ सेटचा प्रत्येक तुकडा काळजीपूर्वक हातानं तयार केलेला आहे. शुक्रवारी झालेल्या उपराष्ट्राध्यांसोबत झालेल्या चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे समकक्ष स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली. या दरम्यान, त्यांनी मॉरिसन यांना चांदीच्या गुलाबी मीनाकारी जहाज भेट दिलं. जपानचे पंतप्रधान योशिहिडा सुगा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांना चंदनाची बौद्ध यांची मूर्ती भेट दिली. विशेष गोष्ट म्हणजे जपान आणि भारताला एकत्र आणण्यात बौद्ध धर्माने मोठी भूमिका बजावली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: