'आपका स्वागत है, मेरे दोस्त',मोदींचं इस्त्रायलमध्ये जंगी स्वागत

'आपका स्वागत है, मेरे दोस्त',मोदींचं इस्त्रायलमध्ये जंगी स्वागत

"आपका स्वागत है मेरे दोस्त" असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मोदींची कडकडून गळा भेट घेतली.

  • Share this:

तेल अवीव, 4 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्त्रायल देशानं जंगी स्वागत केलंय. इस्त्रायलला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत म्हणूनच इस्त्रायल देशानं विमानतळावरच मोदींच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली होती. "आपका स्वागत है मेरे दोस्त" असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मोदींची कडकडून गळा भेट घेतली. मोदींनीही मग हिब्रू भाषेतच त्यांचे आभार मानले. मोदींचा हा तीन दिवसीय इस्त्रायल दौरा ऐतिहासिक असाच असणार आहे.

स्वतंत्र भारताचे पंतप्रधान प्रथमच इस्त्रायलच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांचे पंतप्रधान नेतान्याहू सर्व शिष्टाचार बाजूला ठेवत थेट विमानतळावर येऊन मोंदीचं शाही स्वागत केल्याचं बघायला मिळालं. तसंच भाषणांमध्येही मोदींचा आवर्जून 'माझा मित्र' असा उल्लेखही केला.

''आमचे भारतावर प्रेम असून तुमची संस्कृती, इतिहास, लोकशाही आणि विकासासाठी असलेली कटीबद्धता याचा आम्हाला प्रचंड आदर आहे,'' असे नेत्यानाहू यांनी स्वागतपर भाषणात म्हटलंय.

मोदींच्या या इस्त्रायल दौऱ्यामुळे दोन्ही देश आणखी जवळ आले असून यापुढे एकत्र येऊन चांगलं काम करु करू, असंही नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं. तर इस्रायलचा हा दौरा माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मोदींनी सांगितलं.

आर्थिक संबंधांसोबतच संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांचे संबंध आहेत. दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र असल्याचे मोदींनी नमूद केले. तीन दिवसीय इस्रायल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू यांच्या द्विपक्षीय चर्चेसोबतच अनेक महत्वाचे करारही केले जाणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी  26/11च्या हल्ल्यात वाचलेल्या मोशेला भेटणार आहेत. मोशे आता 10 वर्षांचा आहे.

Loading...

विशेष म्हणजे, इस्त्रायल हा मुस्लिमविरोधी देश म्हणून ओळखला जात असल्यामुळे भारताने आतापर्यंत इस्त्राईलपासून दोन हात दूर राहणेच पसंत केलं होतं. मोदींनी मात्र प्रथमच हा विरोध दूर सारत देशाच्या परराष्ट्रीय धोऱणामध्ये नवा इतिहास रचलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 08:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...