डोनाल्ड ट्रम्प,शी जिनपिंग यांना मागे टाकत जगातील टाॅप 3 नेतृत्वात मोदी !

डोनाल्ड ट्रम्प,शी जिनपिंग यांना मागे टाकत जगातील टाॅप 3 नेतृत्वात मोदी !

जागतिक नेत्यांच्या रांगेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वरचष्मा बघायला मिळतोय.

  • Share this:

12 जानेवारी : जागतिक नेत्यांच्या रांगेतही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वरचष्मा बघायला मिळतोय. कारण जागतिक रँकिंगमध्ये नरेंद्र मोदींनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचं रॅकिंग जाहीर केलीये. यात जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल पहिल्या क्रमांकावर आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रा दुसऱ्या स्थानावर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.

विशेष म्हणजे मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाही मागे टाकलं आहे. 2015 साली या रँकिंगमध्ये बराक ओबामा पहिल्या स्थानावर तर मोदी पाचव्या स्थानावर होते.

जागतिक रँकिंग

अँजेला मर्कल (चान्सलर, जर्मनी)

इमॅनुअल मॅक्रां (फ्रान्सचे अध्यक्ष)

नरेंद्र मोदी (पंतप्रधान, भारत)

थेरेसा मे (पंतप्रधान, इंग्लंड)

शी जिनपिंग (अध्यक्ष, चीन)

व्लादिमीर पुतीन (अध्यक्ष, रशिया)

सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद (सौदीचे राजे)

नेत्यानाहू (इस्रायल पंतप्रधान)

हसन रोहानी (पंतप्रधान, इराण)

डोनाल्ड ट्रम्प (अध्यक्ष, अमेरिका)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 09:45 PM IST

ताज्या बातम्या