Home /News /videsh /

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात तासभर चर्चा, मोदींकडून भारतात येण्याचं निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात तासभर चर्चा, मोदींकडून भारतात येण्याचं निमंत्रण

PM Modi Meets Pope Francis: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची भेट घेतली.

  इटली, 30 ऑक्टोबर: PM Modi Meets Pope Francis: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज व्हॅटिकन सिटी येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं आहे. पोप फ्रान्सिस यांनी हे निमंत्रण स्वीकारल्यास त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पोप जॉन पॉल द्वितीय वर्ष 1999 मध्ये भारताला भेट दिली होती. व्हॅटिकनमध्ये पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात केवळ 20 मिनिटांची बैठक होणार होती. मात्र दोघांमधील चर्चा सुमारे तासभर चालली, असे सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस यांनी गरिबी निर्मूलन आणि हवामान बदल रोखण्यासारख्या उपायांवर चर्चा केली. हेही वाचा- Alert! डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आढळलं Black Fungus  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांच्यासोबत झालेल्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना मोदींनी म्हटलं की, पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांना भारत भेटीसाठी आमंत्रित केलं. त्यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितलं होतं की, पंतप्रधान मोदी पोप यांची वैयक्तिक भेट घेतील आणि काही वेळाने शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होईल. सूत्रों ने बताया कि वैटिकन में पीएम मोदी और पोप फ्रांसिस के बीच 20 मिनट की ही मीटिंग तय थी, लेकिन दोनों के बीच करीब घंटे भर बातचीत चली. पीएम मोदी और पोप फ्रांसिस ने गरिबी उन्मूलन और जलवायु परिवर्तन रोकने जैसे उपायों पर चर्चा की. श्रृंगला म्हणाले की व्हॅटिकनने चर्चेसाठी कोणताही अजेंडा निश्चित केलेला नाही. माझा विश्वास आहे की अशी परंपरा आहे की जेव्हा परम आदरणीय (पोप) यांच्याशी चर्चा केली जाते तेव्हा कोणताही अजेंडा नसतो आणि आम्ही त्याचा आदर करतो. मला खात्री आहे की या काळात आपण सर्वसाधारणपणे जागतिक परिस्थिती आणि आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर चर्चेत सहभागी होऊ. हेही वाचा- T20 World Cup: अफगाणिस्तानच्या कॅप्टनला विचारला तालिबानवर प्रश्न, पाहा नबीनं काय दिलं उत्तर VIDEO ते म्हणाले की, कोविड-19, आरोग्याच्या समस्या, आपण एकत्र कसे काम करू शकतो. हे काही विषय आहेत ज्यांची सर्वसाधारणपणे चर्चा केली जाईल असे मला वाटतं. पंतप्रधान मोदी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांच्या निमंत्रणावरून 29 ते 31ऑक्टोबर दरम्यान रोम, इटली आणि व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वैटिकन में पोप फ्रांसिस के साथ मुलाकात की तस्वीरें साझा करते हुए कहा, 'पोप फ्रांसिस के साथ गर्मजोशी भरी मुलाकात हुई, जिसमें उनके साथ विविध विषयों पर चर्चा की और भारत आने का भी न्योता दिया' शुक्रवारी इटलीला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट घेतली.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Narendra modi, Pm modi

  पुढील बातम्या