मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ब्रिटिश पंतप्रधानांच्या शर्यतीत भारताचे जावई पिछाडीवर; लिझ ट्रस यांना 32 गुणांची आघाडी

ब्रिटिश पंतप्रधानांच्या शर्यतीत भारताचे जावई पिछाडीवर; लिझ ट्रस यांना 32 गुणांची आघाडी

ब्रिटनमध्ये विद्यमान परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस हे भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर वरचढ ठरत आहे.

ब्रिटनमध्ये विद्यमान परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस हे भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर वरचढ ठरत आहे.

ब्रिटनमध्ये विद्यमान परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस हे भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर वरचढ ठरत आहे.

    लंडन, 17 ऑगस्ट : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक पहिल्यापासून आघाडीवर होते. मात्र, आता ते पिछाडीवर पडल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान आणि सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत विद्यमान परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर वरचढ ठरत आहेत. कंझर्वेटिव्हहोम वेबसाइटद्वारे यूके टोरी (कंझर्वेटिव्ह) सदस्यांच्या नवीन सर्वेक्षणात लिझ ट्रसने ऋषी सुनक यांच्यावर निर्णायक 32 गुणांची आघाडी घेतली आहे. बुधवारी प्रभावशाली वेबसाइट कंझर्व्हेटिव्हहोमने मतदान केलेल्या 961 टोरी सदस्यांपैकी जवळपास 60 टक्के सदस्यांनी लिझ ट्रस यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नवीन नेत्याच्या नियुक्तीला पाठिंबा दिला, तर केवळ 28 टक्के लोकांनी सुनक यांना पाठिंबा दिला. रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीचा निकाल 5 सप्टेंबर रोजी येईल, ज्यामध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विजेता बोरिस जॉन्सन यांच्याकडून पदभार स्वीकारेल. कंझर्व्हेटिव्हहोमच्या मते, सर्वेक्षण केलेल्या लोकांपैकी फक्त 9 टक्के लोक अजूनही गोंधळलेले आहेत. एकूण 60% लोकांनी आधीच मतदान केल्याचे सांगितले, तर 40% लोकांनी मतदान केले नाही. लिझ ट्रस बऱ्याच काळापासून ऋषी सुनक यांच्यावर आघाडी मिळवत आहेत. पक्ष आणि देशाचे नेतृत्व करण्यासाठी लिझ ट्रस या अनेकांच्या आवडत्या उमेदवार आहेत. अमेरिका-चीन भिडणार? पेलोसींच्या दौऱ्यानंतर 12 दिवसांनी US खासदार पुन्हा तैवानला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पिछाडीवर तत्पूर्वी, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणि ब्रिटनमधील सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत असलेल्या विद्यमान परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी त्यांचे निकटवर्ती प्रतिस्पर्धी आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर 22 गुणांची निर्णायक आघाडी घेतली होती. सोमवारी जाहीर झालेल्या टोरी (कंझर्व्हेटिव्ह) सदस्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 'द ऑब्झर्व्हर' वृत्तपत्राने कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 570 सदस्यांचा समावेश असलेल्या 'ओपीनियम पोल'नुसार, 61 टक्के सदस्यांनी ट्रसला पाठिंबा दिला तर 39 टक्के भारतीय वंशाच्या सुनक यांना पाठिंबा देण्याचे सांगितले आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Britain

    पुढील बातम्या