Home /News /videsh /

प्लास्टिक शिल्ड Coronavirus पासून बचावासाठी बिनकामाच्या - संशोधनातून नवीन माहिती समोर

प्लास्टिक शिल्ड Coronavirus पासून बचावासाठी बिनकामाच्या - संशोधनातून नवीन माहिती समोर

विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक शिल्ड बिनकामाच्या असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे.

    टोकियो, 25 सप्टेंबर :  कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचावासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर (Corona vaccine) संशोधन सुरू आहे. पण लस येईपर्यंत सर्वात प्रभावी उपाय म्हणून सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्डचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात येत आहे.  पण  विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्रास वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक शिल्ड फारशा उपयुक्त नसल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे. सॅनिटायझरनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जगभरात प्लॅस्टिक शिल्डचा वापर करताना दिसून येत आहेत. पण ही प्लॅस्टिक शिल्ड सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. जपानमध्ये यासंबंधित संशोधन करण्यात आलं . रिकेन सेंटर फॉर कम्प्युटर सायन्समध्ये प्लास्टिक शिल्ड विषाणूला रोखण्यात किती उपयुक्त आहे याविषयी अभ्यास करण्यात आला. या शास्त्रज्ञांचे टीम लीडर असणारे मोटो त्सुबोकोरा म्हणाले, 'फेस शिल्डकडे मास्कला पर्याय म्हणून पाहू नये. फेस मास्कच्या तुलनेत प्लॅस्टिक शिल्ड कमी सुरक्षित आहे.' यामुळे आता कोरोनापासून बचावासाठी नक्की काय प्रभावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जपानमधील या संशोधन केंद्रात करण्यात आलेल्या चाचणीत जपानी सुपर कम्प्युटरनुसार,प्लॅस्टिक शिल्ड एरोसोल्सला पकडण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झालेलं नाही. त्याचबरोबर हे प्लॅस्टिक शिल्ड पूर्णपणे कोरोनापासून आपलं संरक्षण करत नसल्याचंदेखील सिद्ध झालं आहे. जपानमधील रिकेन सायंटिफिक रिसर्च सेंटर कंपनीचा फुगाकू सुपर कम्प्युटर अतिशय वेगवान आहे. त्याच्या मदतीनं हे संशोधन करण्यात आलं असून, यामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जपानचा हा सुपर कॉम्प्युटर एका सेकंदात 415 क्वाड्रिलियनची गणना करू शकतो. श्वासोच्छवासातून पाण्याचे थेंब कसे पसरले जातात याचादेखील याने शोध लावला आहे. प्लॅस्टिक शिल्डच्या या प्रयोगात या कम्प्युटर फुगाकूने प्लॅस्टिक  फेस शिल्डचं स्टिमुलेशन केलं आहे. ज्यात 100 टक्के एयरबॉर्न ड्रॉपलेट्स 5 मायक्रोमीटरहून लहान आढळले. त्यामुळं हे प्लॅस्टिक शिल्ड कोरोनापासून बचाव करू शकत नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान,  विविध देशांमध्ये देखील हे प्लॅस्टिक शिल्ड वापरण्यासाठी कोणतीही नियमावली नाही. मात्र तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही हे वापरू शकता. मात्र यामध्ये तुमचा चेहरा आणि नाक पूर्णपणे झाकलं जायला हवं, असं स्कॉटलंडच्या सरकारने म्हटलं आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्येही यासाठी कोणतीही नियमावली नाही. मात्र आता जपानमधील या संशोधनाच्या निष्कर्षानंतर नागरिक काय करतात हे पाहणं  महत्वाचं ठरणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या