S M L

तुर्कीत विमान धावपट्टीवरून घसरलं; 162 प्रवासी सुरक्षित

हे विमान धावपट्टीवरून घसरून समुद्रकिनाऱ्याकडं झुकलं.

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 14, 2018 04:42 PM IST

तुर्कीत विमान धावपट्टीवरून घसरलं; 162 प्रवासी सुरक्षित

14 जानेवारी : तुर्कीत एक मोठा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुणीच दगावलेलं नाही. तुर्कीच्या ट्रॅबझन विमानतळावर लँडिग करताना एक विमान धावपट्टीवरून घसरलंय. हे विमान धावपट्टीवरून घसरून समुद्रकिनाऱ्याकडं झुकलं.

या अपघातातून सुदैवानं 162 प्रवासी बचावलेत. पेगॉशस कंपनीचं हे विमान आहे. विमान ट्रॅबझन विमातळावर उतरल्यानंतर अचानक घसरलं. हे विमान घसरल्यानंतर संरक्षक भिंत तोडून विमान कड्याच्या टोकाला येऊन लोंबकळलं. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्यात मात्र जीवीतहानी अशी झाली नाही. अद्यापही चिखलात रूतलेलं विमानाबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या विमानाचा व्हिडियो मात्र सर्वत्र व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close