मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आकाशातून थेट घरावर कोसळलं विमान, पाहा भयानक VIDEO

आकाशातून थेट घरावर कोसळलं विमान, पाहा भयानक VIDEO

आकाशातून चाललेल्या एका विमानाला आग लागल्यामुळे ते घरावर (Plane crashed and collapsed on home) कोसळून मोठी हानी झाल्याची घटना समोर आली आहे.

आकाशातून चाललेल्या एका विमानाला आग लागल्यामुळे ते घरावर (Plane crashed and collapsed on home) कोसळून मोठी हानी झाल्याची घटना समोर आली आहे.

आकाशातून चाललेल्या एका विमानाला आग लागल्यामुळे ते घरावर (Plane crashed and collapsed on home) कोसळून मोठी हानी झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

कॅलिफोर्निया, 12 ऑक्टोबर : आकाशातून चाललेल्या एका विमानाला आग लागल्यामुळे ते घरावर (Plane crashed and collapsed on home) कोसळून मोठी हानी झाल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात (Plane collapsed in residential area) एक विमान निवासी भागात कोसळलं. एका घरावर हे पेटतं विमान  कोसळलं आणि एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत दोन जण ठार झाल्याची (Two died in an accident) प्राथमिक माहिती समोर येत आहे.

असा झाला अपघात

अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागात दोन इंजिन असणारं विमान कोसळल्यानंतर मोठी खळबळ उडाली. निवासी भागात हे विमान कोसळलं. याच भागात एक शाळादेखील आहे. शाळेच्या इमारतीचंही यात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाला दोन इंजिनं होती, मात्र तरीही या अपघातात दुसऱ्या इंजिनाचा काहीही उपयोग होऊ शकला नाही. विमानाला आग लागल्यामुळे जोरदार धमाका झाला आणि विमान जमिनीवर कोसळलं.

रिपोर्टमधील दाव्यानुसार, सेसना 340 नावाच्या या विमानातून 6 प्रवासी प्रवास करू शकतात. या विमाानानं ऍरिझोनावरून उड्डाण केलं होतं. त्यानंतर काही मिनिटांतच विमानाला आग लागली आणि ते खाली कोसळलं. विमान कोसळल्यानंतर घरांनाही आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवत असल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.

हे वाचा - 'महागाई वाढलीये तर कमी खा'; पाकिस्तानी मंत्र्याचा अजब सल्ला, जनता शॉक

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगोदर हे विमान घरावर कोसळलं. त्यामुळे घराने पेट घेतला. त्यानंतर ते विमान एका ट्रकला जाऊन धडकलं. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले. सध्या आग विझवण्यात आली असून जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. घरावर विमान कोसळण्याच्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आकाशातून विमान उडण्याचा आवाज ऐकला तरी लोकांना धास्ती वाटत असल्याचं सांगण्यात येत आहे.

First published:

Tags: Accident, Airplane, America