Home /News /videsh /

पाकिस्तानातील धक्कादायक सत्य आलं समोर; 40 टक्के पायलटांकडे बनावटी परवाने

पाकिस्तानातील धक्कादायक सत्य आलं समोर; 40 टक्के पायलटांकडे बनावटी परवाने

गेल्या महिन्यात कराची येथे झालेल्या विमान अपघातात पायलटच्या निष्काळजीपणामुळे 8 केबिन क्रूसह 97 जण ठार झाले होते

    इस्लामाबाद, 24 जून : कराची येथे गेल्या महिन्यात झालेल्या विमान अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. 22 मे रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये विमान अपघाताच्या तपासाचा अहवाल बुधवारी संसदेत सादर करण्यात आला. हा अहवाल सादर करताना विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान म्हणाले, विमानात तांत्रिक दोष नव्हता. या दुर्घटनेला पायलट, केबिन क्रू आणि एटीसी जबाबदार आहेत. क्रॅशपूर्वी पायलट कोरोनाव्हायरसवर चर्चा करीत होते. आमच्याकडे याचे रेकॉर्डिंग आहे. कराची विमान अपघातात 8 केबिन क्रूसह 97 जण ठार झाले होते. या अपघातात दोघेजण बचावले आहेत. . सरवर यांनी पाकिस्तान एअरलाइन्स (पीआयए) वर आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते म्हणाले- सरकारी विमान कंपन्यांमध्ये 40% वैमानिकांकडे बनावट परवाने आहेत. पायलटला अति आत्मविश्वासात होता - अहवाल सरवर म्हणाले - या विमानाचे पायलट अति आत्मविश्वासात होते. त्यांनी विमानाकडे लक्ष दिले नाही. एटीसीने त्याला विमानाची उंची वाढवण्यास सांगितली होती. प्रत्युत्तरादाखल एका पायलटने सांगितले की, आम्ही सर्व काही सांभाळू. संपूर्ण उड्डाणादरम्यान, दोन्ही वैमानिक कोरोनाव्हायरसपासून कुटुंबास वाचविण्याविषयी बोलत राहिले. हे वाचा-नरेंद्र मोदींवर टीका करण्याच्या नादात काँग्रेस आमदार स्वत:च झाले ट्रोल विमानाने धावपट्टीला तीन वेळा केला स्पर्श तपासाचा प्रारंभिक अहवाल सादर करताना सरवर पुढे म्हणाले - या अपघातास जो जबाबदार असेल त्याला वाचवलं जाणार नाही. वैमानिकांनी लँडिंग गिअर न उघडता तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला. यामुळे विमानाचे इंजिन खराब झाले. आणि नंतर विमान कोसळले. पायलट आणि एटीसी यांच्यात चर्चेची संपूर्ण नोंद आमच्याकडे आहे. मी ते स्वतः ऐकले आहे. वैमानिकांच्या भरतीत राजकीय हस्तक्षेप सरवर यांनी पीआयएबाबत धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले - आमच्या सरकारी विमान कंपन्यांमध्ये 40% पायलट असे आहेत जे बनावट परवान्यासह विमानांचं उड्डाण करतात. या लोकांनी कधीही परीक्षा दिली नाही किंवा त्यांना उड्डाणांचा अनुभवही नाही. त्यांच्या भरतीत राजकीय हस्तक्षेप आहे. त्यांच्या वैमानिकांच्या डिग्रीदेखील बनावट असल्याचे आढळून आले आहे.  
    First published:

    Tags: #pakistannews

    पुढील बातम्या