मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

या देशात मुलांना मारणं म्हणजे गुन्हा, सरकारनं आणणार नवा कायदा

या देशात मुलांना मारणं म्हणजे गुन्हा, सरकारनं आणणार नवा कायदा

जगभरात मुलांची अशा छळापासून सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक देशांमध्ये कडक कायदेही करण्यात आले आहेत.

जगभरात मुलांची अशा छळापासून सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक देशांमध्ये कडक कायदेही करण्यात आले आहेत.

जगभरात मुलांची अशा छळापासून सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक देशांमध्ये कडक कायदेही करण्यात आले आहेत.

    मेक्सिको सिटी, 14 डिसेंबर : मेक्सिकोनं (Mexico)एक नवीन कायदा मंजूर केला आहे, ज्यामुळे आता आई-वडील आपल्या मुलांना मारू शकणार नाहीत. अशी मारहाण केल्यास तो गुन्हा ठरेल. मेक्सिकोच्या संसदेत (Mexico Parliament) मुलांना मारहाण करण्यास बंदी घालणारा कायदा मंजूर झाला असून, आता तो राष्ट्रपतींकडे (President) मंजुरीसाठी गेला आहे. त्यांची सही होताच या देशात हा कायदा लागू होईल. भारतासह अनेक देशांमध्ये आई-वडील किंवा शिक्षक मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मार देण्याचा मार्ग सहज अवलंबतात; पण मेक्सिकोमध्ये आता चुकून जरी आई-वडिलांनी मुलांना मार दिला तर त्यांना शिक्षा होऊ शकते. आई-वडिल, शिक्षक, प्रशिक्षक कोणीही मुलांना शारीरिक शिक्षा करण्यास कायदेशीर बंदी घालणारे विधेयक या संसदेच्या कनिष्ठ सभागृहानं मंजूर केलं आहे. आतापर्यंत एक ते 14 वर्ष वयोगटातील 63 टक्के मुलांनी शारीरिक शिक्षा भोगली आहे, असा अंदाज असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. मुलांना ढकलणं, केस किंवा कान ओढणं, ओरखडे काढणं, कापणं किंवा अजाण मुलांना त्रासदायक ठरेल अशा अवस्थेत आणणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. या नव्या कायद्यात मुलांना मारहाण करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद आहे. युएन चिल्ड्रन फंडच्या (UN Children Fund) 2017 मधील अहवालाच्या आधारे हा कायदा तयार करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे वाचा-रोटी मेकरनंतर आता फूट मसाज यंत्र; शेतकऱ्यांच्या आंदोलनात मदतीचा हात या अहवालानुसार, जगभरातील दोन ते चार वर्षे वयोगटातील 30 कोटी मुलं केअरटेकरकडून होणाऱ्या मानसिक किंवा शारीरिक किंवा दोन्ही प्रकारच्या छळाचा सामना करतात. युनिसेफच्या चाईल्ड प्रोटेक्शन विभागाचे (Unicef Child Protection) प्रमुख कॉर्नेलियस विलियम्स यांनी म्हटलं आहे की, मुलांबरोबर होणाऱ्या छळाला काही सीमा नाही. जगभरातील अनेक मुलांना शाळेत, डे-केअरमध्येही वाईट अनुभव येतात. मुला-मुलींचा लैंगिक छळही केला जातो. अशा प्रकारचे विविध अहवाल युएननं जारी केले आहेत. लैंगिक शोषण, शारीरिक हिंसाचार, मानसिक छळ, गुन्हेगारी करण्यास भाग पाडणं अशा अनेक प्रकारच्या अत्याचारांना मुलांना सामोरं जावं लागतं. जगभरात मुलांची अशा छळापासून सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक देशांमध्ये कडक कायदेही करण्यात आले आहेत. जागतिक पातळीवर युएनच्या सहकार्यानं अनेक स्वयंसेवी संस्थाही मुलांना सुरक्षित आयुष्य जगता यावं यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या