सूर्याच्या पृष्ठभागावर सोन्याची चमक आणि मधमाशांची पोळी, पहिल्यांदाच समोर आले फोटो

सूर्याच्या पृष्ठभागावर सोन्याची चमक आणि मधमाशांची पोळी, पहिल्यांदाच समोर आले फोटो

सूर्य हा आग ओकणारा गोळा असल्याने त्याचे इतक्या जवळचे फोटो अशक्य मानले जात होते. सूर्याच्या पृष्ठभागावर दर 14 सेकंदांनी मोठमोठ्या स्फोटासारख्या घटना घडत असतात.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : चंद्राला लांबूनच पाहून आपण तिथे ससे हरणं आणि टेकड्या आहेत, असं कल्पनेने आणि गमतीने म्हणायचो. आता तर चांद्रयान 2च्या ऑर्बिटरने चंद्राचं सुस्पष्ट आणि प्रकाशमान छायाचित्र पाठवलं आहे. त्याचप्रमाणे सूर्याच्या पृष्ठभागाचीही आकर्षक छायाचित्रं पहिल्यांदाच समोर आली आहेत.या फोटोत सूर्याचा पृष्ठभाग सोनेरी झलक आणि मधमाशांच्या पोळ्यांसारखा दिसतो आहे. मधमाशांच्या पोळ्यांसारखी ही रचना सतत आक्रसत आणि पसरत राहते. त्यातूनच तीव्र उष्णता बाहेर पडते. सूर्याचे हे फोटो हवाई बेटावरच्या दुर्बिणीने काढले आहेत.

दर 14 सेकंदाला स्फोट

या दुर्बिणीने पहिल्यांदाच सूर्याच्या पृष्ठभागाचे इतके जवळून फोटो काढले आहेत. सूर्य हा आग ओकणारा गोळा असल्याने त्याचे इतक्या जवळचे फोटो अशक्य मानले जात होते. सूर्याच्या पृष्ठभागावर दर 14 सेकंदांनी मोठमोठ्या स्फोटासारख्या घटना घडत असतात.

एकेक सेल शेकडो किलोमीटर

सूर्याच्या पृष्ठभागावरचे हे फोटो पाहिले तर एकेक सेल खूप छोटी दिसते पण त्याचं क्षेत्रफळ शेकडो किलोमीटर आहे. एकेका सेलचं क्षेत्रफळ जगातल्या मोठमोठ्या देशांच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त आहे.या दुर्बिणीने सूर्याच्या पृष्ठभागाचा व्हिडिओही बनवलाय.या व्हिडिओमध्ये तिथे होणारे स्फोट चित्रित केलेत.यामध्ये तब्बल 200 दशलक्ष चौरस किमीचं क्षेत्रफळ चित्रित झालं आहे. '

'गॅलिलिओ'नंतरचं संशोधन

हवाईच्या अवकाश संशोधन केंद्राचे तज्ज्ञ जेफ कून यांच्या मते, सूर्याबद्दलच्या संशोधनातली ही मोठी झेप आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असा दावा पहिल्यांदा गॅलिलिओने केला होता. त्यानंतरचं हे सर्वात मोठं संशोधन आहे. या दुर्बिणीमध्ये आणखी काही उपकरणं जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सूर्यावरच्या घडामोडींचा पृथ्वीवर नेमका काय परिणाम होतो याबद्दलही संशोधन करता येईल.

=================================================================================

First published: January 30, 2020, 9:45 PM IST

ताज्या बातम्या