Home /News /videsh /

बापरे! जगातील सर्वात लांब पापण्या असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल, घालावी लागते वेणी

बापरे! जगातील सर्वात लांब पापण्या असलेल्या महिलेचा फोटो व्हायरल, घालावी लागते वेणी

यूचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. 2016 मध्ये तिचं नाव जगातील सर्वात लांब पापण्याची (Longest Eyelashes) महिला म्हणून नोंदवलं गेलं होतं.

    नवी दिल्ली 13 जून: जगात अनेक पद्धतीचे रेकॉर्ड (World Records) बनतात आणि तुटतात. काही लोक नैसर्गिकरित्या मिळालेल्या देणगीमुळे रेकॉर्ड बनवतात तर काही वेगळेच कारनामे किंवा काहीतरी मोठी गोष्ट करुन हा रेकॉर्ड आपल्या नावी करतात. असे अनेक लोक आपण पाहिले असतील ज्यांचे बॉडी पार्ट (Weird Body Parts) म्हणजेच शरीरातील काही अवयव विचित्र असतात. काही लोक आपल्या उंचीमुळे तर काही जाडीमुळे रेकॉर्ड बनवतात. आज आम्ही तुम्हाला चीनच्या यूबद्दल सांगणार आहोत. या महिलेला पाहिल्यानंतर तुमची नजर तिच्या पापण्यांवरुन हटणार नाही. यूचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. 2016 मध्ये तिचं नाव जगातील सर्वात लांब पापण्याची (Longest Eyelashes) महिला म्हणून नोंदवलं गेलं होतं. त्यावेळी तिच्या पापण्या 4.88 इंच लांब होत्या. मात्र, आता तिनं स्वतःचाच रेकॉर्ड तोडला आहे. आता तिच्या पापण्या तेव्हापेक्षा दुप्पट लांब झाल्या आहेत. पाच वर्षात तिच्या पापण्या 20.5 इंच लांब झाल्या आहेत. तिची अशी अवस्था का आहे, याचा तपास अद्याप डॉक्टरही लावू शकलेले नाहीत. तिच्या पापण्या गालाच्या खालीपर्यंत पोहोचल्या आहेत. पोलिसांच्या VIDEO चाच वापर करून सायबर गुन्हेगारांनी केली 80 लाखांची फसवणूक यूच्या पापण्या इतक्या लांब का आहेत याचं उत्तर अद्याप डॉक्टरांनाही सापडलेलं नाही. तज्ज्ञांनीही याप्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला, मात्र खरं कारण कोणीही शोधू शकलं नाही. मात्र, यूचं असं म्हणणं आहे, की तिला मिळालेल्या लांब पापण्या ही बुद्धांची देण आहे. तिनं सांगितलं, की तिच्या पापण्या आधी इतक्या लांब नव्हत्या. यानंतर 2015 मध्ये ती डोंगराळ भागात दीड वर्ष राहिली. इथून परतल्यानंतर तिच्या पापण्या अत्यंत वेगानं वाढू लागल्या. आपल्या पापण्यांमुळे यू अत्यंत आनंदी आहे. यूचं असं म्हणणं आहे, की या पापण्यांमुळे ती अतिशय तरुण दिसते. सोबतच तिचं शरीरही आतून स्ट्राँग झालं आहे. तिला असं वाटतं, की या पापण्यांमुळे तिच्यातील शक्ती आणखी वाढली आहे. आपल्या पापण्यांमुळे ती सहज लोकांच्या नजरेत येते आणि तिला जास्त मेकअपची गरजही पडत नाही. अनेकदा तिच्या पापण्या तुटतात मात्र त्या पुन्हा वाढतातही. आपल्या पापण्यांमुळे यू चांगलीच चर्चेत आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Viral, World record

    पुढील बातम्या