Home /News /videsh /

Shocking! पोलीस चीफ केस कापण्यासाठी लागले मागे; संतापलेल्या जवानाने बंदुक काढून झाडल्या गोळ्या

Shocking! पोलीस चीफ केस कापण्यासाठी लागले मागे; संतापलेल्या जवानाने बंदुक काढून झाडल्या गोळ्या

पोलीस दलामध्ये मोठे केस ठेवण्याची परवानगी नसते. मात्र या जवानाचं आपल्या केसांवर खूपच प्रेम होतं.

    मनीला, 7 ऑगस्ट : फिलिपीन्स येथील (Philippines) पोलीस प्रमुखाला (Police Chief) एका पोलीस कर्मचाऱ्याला ओरडणं महागात पडलं आहे. पोलीस प्रमुखाने ओरडल्यानंतर पोलिसाने रागाच्या भरात गोळी मारून प्रमुखाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार याची सुरुवात पोलीस कर्मचाऱ्याच्या मोठ्या केसांपासून झाली. यानंतर रागाच्या भरात कर्मचाऱ्याने पोलीस प्रमुखावर गोळी चालवली यात त्यांची हत्या झाली. यानंतर इतर पोलिसांनी प्रत्युत्तर देत कर्मचाऱ्यावरही गोळीबार केला. यात त्याचाही मृत्यू झाला. ही घटना फिलिपीन्स येथील सुलु प्रांतात झाल्याचं सांगितलं जात आहे. (Philippines police chief shouted for a haircut to the soldier he shot them ) पोलीस चौकीत घडला हा प्रकार स्थानिक मीडियामधील बातमीनुसार, जोलोच्या अस्टुरियस गावातील चौकीवर प्रांतील पोलीस निर्देशक कर्नस माउकल बावयान क्वारंटाइन नियमावलीबाबत चौकशी करीत होते. यादरम्यान ही घटना घडली. कर्नल बावयान यांनी पोलीस कर्मचारी सार्जेंट इमरान जिलाह याचे लांब केस पाहून नाराज झाले. ते लांब केसावरुन त्याला ओरडले व तेथून निघून गेले. त्यानंतर ते पोलीस शिबीरातील कात्री घेऊन चौकीवर आले. कदाचित त्याचा प्रयत्न कर्मचाऱ्याचे केस कापण्याचा असावा. मात्र यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ते जिलाहच्या जवळ जाताच त्याने पोलीस प्रमुखावर गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. हे ही वाचा-प्रायव्हेट पार्ट आधी जळावा म्हणून चितेवर उलटा ठेवला चिमुरडीचा मृतदेह अचानक झालेल्या गोळीबारीच्या घटनेमुळे इतर पोलीसही हैराण झाले. यानंतर पोलीस प्रमुखाच्या सुरक्षासाठी तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळी मारून त्याची हत्या केली. राष्ट्रीय पोलीस प्रमुख जनरल यांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या