'Pfizer ची कोरोना लस घेतली तर स्त्रियांना दाढी येईल'; ब्राजीलच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केली शंका

'Pfizer ची कोरोना लस घेतली तर स्त्रियांना दाढी येईल'; ब्राजीलच्या राष्ट्रपतींनी व्यक्त केली शंका

महिलांना दाढी येण्याबरोबरच अनेक भयंकर गोष्टी घडतील असं ब्राजीलच्या राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं आहे

  • Share this:

ब्रासीलिया, 19 डिसेंबर : ब्राजीलचे राष्ट्राध्यक्ष ( President of Brazil) जायर बोल्सोनारो हे अद्यापही कोरोना लशीविरोधात टीका करीत आहे. अमेरिकन कंपनी फायझर (Pfizer) आणि तिची जर्मन भागीदार बायोएनटेक (BioNTech) ही लस लोकांचं रुप बदलेल. ही लस घेतली तर लोक मगर होतील, नाहीतर महिलांना दाढी तरी उगवेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, बोल्सोनारो हे कोरोना महासाथीच्या आजाराची (Coronavirus) आधी पासूनच तीव्रता नाकारत आले आहेत. या आठवड्यात त्यांनी जाहीर केलं आहे की, देशात लस सुरू असली तरी आपण ही लस घेणार नाही.

बोल्सोनारो यांनी गुरुवारी सांगितलं होतं की, (Pfizer) 'फायझरबरोबरच्या करारामध्ये हे स्पष्ट झालं आहे की, आम्ही (कंपनी) कोणत्याही दुष्परिणामांसाठी जबाबदार नाही. जर आपलं रुप बदलून तुम्ही मगर झालात तर ही आपली समस्या आहे. ब्राझीलमध्ये कित्येक आठवड्यांपासून लशीची चाचणी सुरू आहे आणि लोकांना यूके-अमेरिकेच्या ट्रायलबाहेरही लस दिली जात आहे. ते पुढे म्हणाले, ही लस घेतल्यानंतर जर तुम्ही सुपरह्युमन झाला, स्त्रियांना दाढी आली किंवा पुरुष स्त्रियांच्या आवाजात बोलू लागले तर ते त्याची जबाबदारी घेणार नाहीत."

लस मोफत मात्र अनिवार्य नाही

देशात लशीकरण कॅम्पेनची सुरुवात करीत बोल्सोनारो यांनी सांगितलं की, लस मोफत असेल मात्र अनिवार्य नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, लस घेणं गरजेचं आहे, मात्र लोकांना लस अनिवार्य करू शकत नाही. याचा अर्थ असा की लस घेतली नाही तर लोकांना दंड द्यावा लागणार नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी येण्यास प्रतिबंध घातले जाऊ शकतात, मात्र जबरदस्ती लस दिली जाऊ शकत नाही.

राष्ट्राध्यक्ष लस घेणार नाही

ब्राजीलमध्ये 71 लाखांहून जास्त लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे आणि 1.85 लाखाहून जास्त मृत्यू झाले आहेत. बोल्सोनारे म्हणाले की, लशीला ब्राजीलच्या रेग्युलेटरी एजन्सी Anvisa कडून सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर त्यांच्याव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीला लस मिळेल. त्यांनी आताही ही बाब स्पष्ट केली की ते लस घेणार नाहीत. बोल्सोनारो यांना जुलैमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली होती.

 

Published by: Meenal Gangurde
First published: December 19, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या