Jeff Bezos यांना ठरवलं 'खलनायक', पृथ्वीवर परत न घेण्याची होतेय मागणी; 8000 जणांनी केली स्वाक्षरी

अ‍ॅमेझॉन (Amazon) या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा आणि जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे जेफ बेझोस (Jeff Bezos) सध्या त्यांच्या आगामी अंतराळ वारीमुळे (Space Trip) चर्चेत आहेत. त्यांच्या या अंतराळ वारीला काही जणांकडून जोरदार विरोध होत आहे.

अ‍ॅमेझॉन (Amazon) या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा आणि जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे जेफ बेझोस (Jeff Bezos) सध्या त्यांच्या आगामी अंतराळ वारीमुळे (Space Trip) चर्चेत आहेत. त्यांच्या या अंतराळ वारीला काही जणांकडून जोरदार विरोध होत आहे.

  • Share this:
मुंबई, 18 जून: अ‍ॅमेझॉन (Amazon) या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा आणि जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे जेफ बेझोस (Jeff Bezos) सध्या त्यांच्या आगामी अंतराळ वारीमुळे (Space Trip) चर्चेत आहेत. त्यांच्या या अंतराळ वारीला काही जणांकडून जोरदार विरोध होत आहे. त्यांना अंतराळातून परत पृथ्वीवर येण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात येत असून, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जोस ऑर्टिझ (Jose Ortiz) यांनी ही याचिका तयार केली आहे. 5 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या या याचिकेला चांगलाच पाठिंबा मिळत असून, दर सेकंदाला त्यात सह्यांची भर पडत आहे. जवळपास 8 हजार लोकांनी यावर सह्या केल्या असून, सोशल मीडियावर ही स्वाक्षरी मोहीम जबरदस्त व्हायरल झाली आहे. जेफ बेझोस 20 जुलै रोजी त्यांच्याच ब्लू ओरिजिन (Blue Origin) या स्पेस एक्स्प्लोरेशन (Space Exploration Company) कंपनीनं बनवलेल्या न्यू शेफर्ड (New Shephard) या रॉकेटमधून अंतराळ सफरीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क आणि अन्य दोन व्यक्तीही असणार आहेत. या अंतराळ सफरीवरून बेझोस यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यांची तुलना खलनायक सुपरमॅन लेक्स ल्युथर याच्याशी करण्यात आली आहे. चेंज डॉट ओआरजी (Change.org) या पेजवरील या याचिकेला ‘पिटीशन टू नॉट अलाऊ जेफ बेझोस री-एन्ट्री टू अर्थ’ असं नाव देण्यात आलं असून, त्यात त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीला लक्ष्य करण्यात आलं आहे. हे वाचा-भारतीय वंशाचे Satya Nadella मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष, पगार वाचून व्हाल थक्क डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, नेटिझन्सनी या याचिकेवर स्वाक्षरी करण्याचं आवाहन केलं आहे. यामुळे रॉकेट कंपनीवरील दबाव वाढवण्यास मदत होईल, असं नेटिझन्सनी म्हटलं आहे. लोकांच्या काही अजब सूचनाही येत आहेत. यामध्ये बेझोस यांना टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आणि मार्क झुकेरबर्ग यांनाही सोबत घेऊन जाण्याची सूचना करण्यात आली आहे. बेझोस यांना पृथ्वीवर परत न येऊ देण्याची मागणी करणारी याचिकाही अतिशय मार्मिक शब्दात लिहिण्यात आली आहे.  ‘बेजोस हे लेक्स ल्युथर (Lex Kuthar) आहेत. अत्यंत यशस्वी ऑनलाइन रिटेल स्टोअरचे मालक असलेले बेझोस ही जगावर वर्चस्व गाजवू पाहण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेली व्यक्ती आहे. धनदांडगे आणि राक्षसी मनोवृत्तीच्या लोकांशी त्यांची भागीदारी आहे. अशा व्यक्तींना पृथ्वीवरच काय पण अंतराळातही स्थान देऊ नये. बेझोस यांनी अंतराळातच राहिलं पाहिजे,’ असं ही याचिका तयार करणारे जोस ओर्टीझ यांनी म्हटलं आहे. हे वाचा-धक्कादायक रिपोर्ट! 2022मध्ये IT क्षेत्रात येणार मोठा भूकंप? तब्बल 30 लाख जणांची बेझोस, त्यांचा भाऊ मार्क आणि अन्य दोन अवकाश पर्यटक ब्ल्यू ओरिजिन रॉकेटनं गृहीत धरलेल्या  समुद्रसपाटीपासून 62 मैलांवरील म्हणजे साधारण 100 किलोमीटर अंतरावरील कार्मन लाइन (Karman Line) या एका काल्पनिक सीमारेषेपर्यंत उड्डाण करतील. ब्लू ओरिजिनच्या पश्चिम टेक्सासमध्ये (West Texas) असलेल्या लाँचपॅडवरुन हे रॉकेट उड्डाण करेल. बेझोस आणि त्याचे साथीदार सुमारे तीन मिनिटे वजनहीन अवस्थेत अंतराळात संचार करतील.
Published by:Janhavi Bhatkar
First published: