Home /News /videsh /

Shocking! नाकाचा तुकडाच चावून काढला; कुत्र्याने मालकावरच केला भयंकर हल्ला

Shocking! नाकाचा तुकडाच चावून काढला; कुत्र्याने मालकावरच केला भयंकर हल्ला

जो कुत्रा आपल्या मालकाच्या संरक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकतो, त्यानेच मालकाचा जीव धोक्यात टाकला.

    वॉशिंग्टन, 27 जुलै : भटक्या (Street dog) कुत्र्यांनी (Dog) हल्ला (Dog attack) केल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती (Street dog attack) असतील. पण पाळीव कुत्रा ज्याला अगदी ट्रेन केलेलं असतं तो फक्त अनोळखी व्यक्तींवर भुंकतो किंवा त्यांच्यावर हल्ला (Pet dog attack) करतो. पण मालकाच्या संरक्षणासाठी तो आपला जीवही धोक्यात घालतो. पण अमेरिकेतील एका प्रकरणाने मात्र हादरवलंच आहे. पाळीव कुत्र्याने चक्क आपल्या मालकावरच हल्ला (Pet dog attacked on owner) केला आहे. हा हल्लासुद्धा साधा नाही, तर इतका भयंकर की मालकाच्या नाकाचा तुकडाच त्याने चावून काढला (Dog cut owner nose). मॅनुअल मोरालेसने 2016 साली एका कुत्र्याला आपल्या घरी आणलं. त्याचं नाव त्याने अर्घ ठेवलं. मॅनुअलने अर्घची खूप काळजी घेतली. चार वर्षांत दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली. एक दिवस मॅनुअल बाहेरून घरी परतला त्यावेळी त्याचा कुत्रा जिन्यावर त्याला पाहून शेपटी हलवताना दिसला. मॅनुअलने त्याला कुरवाळण्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्याने अचानकपणे त्याच्यावर हल्लाच केला. हे वाचा - खुनाचा गुन्हेगार 35 वर्षांनी सापडला; मुंबईत पोलीस ठाण्यासमोरच 20 वर्ष राहायचा डेली स्टार यूकेच्या रिपोर्टनुसार अर्घने मॅनुअलच्या तोंडावरच अटॅक केला. मॅनुअलने त्याच्या तावडीतून सुटण्याची झटापट केली. पण कुत्र्याने त्याला गंभीर जखमी केलं. त्याच्या नाकाचा तुकडाच पाडला. त्याच्या चेहऱ्यावरून खूप रक्त वाहत होते. त्याचवेळी त्याच्यासोबत राहणारे त्याचे रूममेट धावून आले आणि त्यांनी कसंबसं त्याला अर्घच्या तावडीतून सोडवलं. त्याला तात्काळा ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. आठवडाभरापेक्षा जास्त दिवस त्याच्यावर उपचार झाले. हे वाचा - VIDEO : एका हातात मान धरली आणि सटासट मारत गेली; भररस्त्यात तरुणींची फायटिंग अर्घ इतका हिंसक का झाला, याबाबत मॅनुअलने पशुतज्ज्ञांना विचारणा केली, त्यावेळी त्याच्या कुत्र्याला कॅन्सर झाल्याचं समजलं. त्याला ब्रेन ट्युमर होता, ज्यामुळे त्याचा स्वभाग असा बदलला होता. अखेर या कुत्र्याला मृत्यू देण्यात आला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dog, Owner of dog, Pet animal

    पुढील बातम्या