वॉशिंग्टन, 10 सप्टेंबर : मानसिक आरोग्य बिघडलेली माणसं आपण आपल्या अवती-भोवती पाहिली असतील. त्यांच्याकडे सहसा अनेकजण दुर्लक्ष करतात, मात्र काही घटनांमध्ये त्यांच्या हरकती दुर्लक्ष करण्यासारख्या नसतात. मानसिक स्थिती योग्य नसलेली एखादी व्यक्ती अशी काही कृत्ये करते, जी खूप विचित्र असतात. गेल्या वर्षी अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये एका व्यक्तीनं सुपरमार्केटमध्ये असं कृत्य केलं त्यानंतर त्याला ताबडतोब पकडण्यात आलं आणि तुरुंगात टाकण्यात आलं. आता त्याला कायद्यानुसार 10 वर्षांची शिक्षा झाली आहे.
हे विचित्र प्रकरण गेल्या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी घडलं होतं. येथे राहणाऱ्या थॉमस नावाच्या व्यक्तीनं केटी पीटर्स या महिलेसोबत क्रिस्टोफर फाइन फूड नावाच्या सुपरमार्केटमध्ये गैरवर्तन केलं. केटीने सांगितले की, सुपरमार्केटमध्ये खरेदी करत असताना अचानक थॉमसने तिला मागून येऊन पकडले आणि तिच्या कंबरेखाली त्यानं इंजेक्शन दिलं. या इंजेक्शनमध्ये त्यानं त्याचे शुक्राणू भरले होते. कहर म्हणजे केटीला इंजेक्शन दिल्यानंतर त्यानं अगदी प्रेमळ आवाजात विचारलं की खूप दुखलं तर नाही ना? या प्रकरणानंतर पोलिसांनी थॉमसला अटक केली.
हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद
कॅटीने इंजेक्शन दिल्यानंतर चांगलाच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तिचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमले. केटीने सांगितलं की, त्या व्यक्तीने तिच्या कंबरेखाली इंजेक्शन दिलं आहे आणि ते शुक्राणूंनी भरलेलं होतं. हे ऐकून लोकांनी थॉमसला पकडलं. नंतर सुपरमार्केटचा सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आला. थॉमस कॅटीच्या मागे इंजेक्शन घेऊन उभा असल्याचे दिसले. ती वळताच तिने तिला शुक्राणूंनी भरलेले इंजेक्शन दिलं.
कॅटीला नाहक त्रास सहन करावा लागला
कॅटीनं सांगितलं की, जेव्हा तिला इंजेक्शन देण्यात आलं तेव्हा तिला अचानक काय होतंय हे समजलंच नाही. या प्रकारानंतर तिथून ती तिच्या घरी निघून गेली. घरी परतत असताना वाटेत तिला खूप वेदना होऊ लागल्या. घरी पोहोचल्यावर त्यांनी व्यवस्थित पाहिले असताना त्यांना कंबरेच्या खाली जखम झाल्याचे आढळून आले. यानंतर, कॅटीने डॉक्टरांकडे जावून तपासणी केली आणि पोलिसांनाही कळवले. तपासात थॉमसच्या कारमधून शुक्राणूंनी भरलेले इंजेक्शन सापडले. तसंच त्यानं हे देखील कबूल केलं की, त्यानं केटीला शुक्राणूचे इंजेक्शन दिले होते. आता या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर थॉमसला 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Crime news, Mental health