• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं वैयक्तिक आयुष्य अतिशय रंजक, जाणून घ्या किती आहे संपत्ती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं वैयक्तिक आयुष्य अतिशय रंजक, जाणून घ्या किती आहे संपत्ती

वास्तविक पुतिन यांनी आपल्या सामाजिक (Social), राजकीय (Political) जीवनापासून कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबी या दूरच ठेवल्या आहेत. इतकंच काय तर त्यांच्याकडे नेमकी संपत्ती किती आहे, याबाबत देखील फारशी माहिती नाही

  • Share this:
मॉस्को 18 जून : रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांची राजकीय वाटचाल सर्वश्रुत आहे. रशियामध्ये त्यांचे एकहाती वर्चस्व आहे. मोठ्या आणि संपन्न राष्ट्राचे प्रमुख म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय म्हणावी लागेल. त्यांचे श्रीमंत राहणीमान, संपत्ती आणि वैयक्तिक आयुष्य याबाबत आजही लोकांमध्ये उत्सुकता आहे. वास्तविक पुतिन यांनी आपल्या सामाजिक (Social), राजकीय (Political) जीवनापासून कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबी या दूरच ठेवल्या आहेत. इतकंच काय तर त्यांच्याकडे नेमकी संपत्ती किती आहे, याबाबत देखील फारशी माहिती नाही. रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक मानले जातात. एका अहवालानुसार पुतिन यांच्याकडे 160 अब्ज पौंड म्हणजेच 16555 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या कौटुंबिक (Family) आणि खासगी आयुष्यावर एक दृष्टीक्षेप टाकूया... रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (American President Joe Biden) यांची नुकतीच भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 4 तास चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे, की अमेरिकेचे रशियासोबत असलेले संबंध यापूर्वी इतके खराब कधीच नव्हते. मात्र पुतिन हे जगातील रहस्यमय नेत्यांपैकी एक आहेत, ही बाब देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. द सनच्या वृत्तानुसार, व्लादिमीर पुतिन हे सार्वजनिक ठिकाणी आपल्या परिवाराविषयी कधीही भाष्य करत नाहीत, तसेच आपल्या मुलींचा उल्लेखही ते सार्वजनिक ठिकाणी टाळतात. जसे त्यांचे कुटुंब हे एक रहस्य आहे, तसेच त्यांची संपत्तीदेखील. पुतिन यांच्याकडे स्वतःचे वैयक्तिक जेट असून, घड्याळांचे मोठे कलेक्शनदेखील आहे. त्यांच्या मालकीच्या वैविध्यपूर्ण कार, नौका आणि महालदेखील आहेत. पुतिन यांच्याकडे 160 अब्ज पौंड म्हणजेच 16555 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. पुतिन यांना मारिया (Maria) आणि कटरिना (Katrina) या 2 मुली आहेत. ल्युडमिला शक्रेबनेवा यांच्यासोबत घेतलाय घटस्फोट झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, व्लादिमीर पुतिन यांनी 1983 मध्ये ल्युडमिला शक्रेबनेवा यांच्याशी विवाह केला होता. ल्युडमिला आणि पुतिन यांना दोन मुली असून त्यांची नावे मारिया आणि कटरिना आहेत. 2013 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. मारिया आहे वैद्यकीय संशोधक व्लादिमीर पुतिन यांची मुलगी मारिया ही वैद्यकिय संशोधक आहे. डच नागरिकत्व असलेला पती जॉरिट फॉसेन यांच्यासोबत ती मॉस्कोमध्ये राहते. तिला एक मुलगा देखील आहे. Mumbai Unlock: मुंबईचा 'या' स्तरात समावेश, जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी कटरिना आहे अक्रोबॅट डान्सर व्लादिमीर पुतिन यांची दुसरी मुलगी कटरिना ही अक्रोबॅट डान्सर आहे. तसेच ती मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीत उच्च पदावर कार्यरत आहे. ती 1.7 अब्ज डॉलरचा एक स्टार्टअपदेखील चालवते. 2017 मध्ये तिचा विवाह अब्जाधीश किली शैमलॉव्ह यांच्यासोबत झाला होता. मात्र नुकताच त्यांचा घटस्फोट झाला आहे. लुईजाविषयी मिळाली मागील वर्षी माहिती स्वेतलाना क्रिवोनोगिख (Svetlana Krivonogikh) आणि व्लादिमीर पुतिन यांना 18 वर्षांची एक मुलगी असून, तिच्याबाबत मागील वर्षी खुलासा झाला. येलिजोवेटा व्लादिमीरोवाना ऊर्फ लुईजा हिच्या जन्मानंतर पुतिन आणि स्वेतलाना हे वेगळे झाले होते. मागील वर्षी कोट्यावधीची मालकीण असलेल्या एका महिला सफाई कर्मचाऱ्यासोबत व्लादिमीर पुतिन यांचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. स्वेतलाना क्रिवोनोगिख हिच्यासोबत 1990 पासून पुतिन यांचे संबंध होते आणि 2003 च्या सुमारास ते वेगळे झाले. एका वृत्तानुसार, 45 वर्षीय स्वेतलाना क्रिवोनोगिख हिची जेव्हा 90 दशकात पुतिन यांच्याशी भेट झाली तेव्हा ती एक क्लिनर होती. परंतु, आता ती सर्वात श्रीमंत महिला असून कोट्यावधींची मालकीण आहे. EPFO New Rule: तुमच्या PF वर कसं आणि किती मिळतं व्याज; असं तपासा व्लादिमीर पुतिन आपल्या लुईजा (Luiza) या मुलीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. लुईजा सोशल मिडीयावर आपले श्रीमंत जीवनशैलीचे प्रदर्शन करत असते. एका अहवालानुसार, पुतिन आपला सर्व पैसा लुईजावर खर्च करतात. एलिना काबायेवालाही करत होते डेट व्लादिमीर पुतिन यांचे 37 वर्षीय जिन्मॅस्ट एलिना काबायेवासोबतही (Alina Kabaeva) नातेसंबंध होते आणि पुतिन तिला डेट करत होते. एलिना ही जिम्नॅस्ट असून तिने ऑलिम्पिकमध्ये 2 वेळा सुवर्णपदक, 14 विश्व विजेतेपद आणि 25 युरोपीय चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. क्रीडाक्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर ती राजकारणात सक्रिय झाली आणि त्यानंतर पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाची खासदार झाली.
Published by:Kiran Pharate
First published: