वॉशिंग्टन 08 मार्च : अमेरिकेतही कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनलीय. रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमेरिकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अशी परिस्थिती असताना आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आलीय. एका निवडणूक प्रचारसभेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं होतं. त्यानंतर एका चाहत्याने त्यांच्याशी हस्तांदोलनही केलं. नंतर झालेल्या चाचणीत तो कोराना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. काही माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. Conservative Political Action Conference मध्ये अध्यक्ष ट्रम्प हे उपस्थित होते आणि त्यात त्यांनी भाषणही केलं होतं. मात्र काही रिपोर्ट्समध्ये या चाहत्याने ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन केलं नाही असंही म्हटलं आहे. अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. मात्र कोरोनाच्या उद्रेकामुळे या प्रचारसंभांवर आता निर्बंध येण्याची शक्यता आहे.
त्या संबंधीत रुग्णावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याला कोरोनासाठीच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शनिवारपर्यंत अमेरिकेत तब्बल 19 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
‘तुम्हाला मते देऊन फायदा झाला नाही’, कामगारांचा अमोल कोल्हेंसमोर तक्रारीचा पाढा
न्यूयॉर्कमध्ये सध्या 89 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून मृत्यांचा आकडा वाढून 19 पर्यंत पोहोचला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एन्ड्रयू कुओमो यांनी सांगितले की, शनिवारी राज्यात 13 नवीन प्रकरणं समोर आली आहे. ज्यामुळे रुग्णांचा आकडा 89 पर्यंत पोहोचला आहे. यामुळे राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित - 87 वर्षीय कोरोना पीडितासाठी 20 वर्षीय डॉक्टर झाला बाबा, रुग्णाचा हट्ट पुरवला
अमेरिकेनंतर भारतातही कोरोना व्हारसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळात पुन्हा कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 39 झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump