हद्दच झाली या तळीरामांची ! दारु संपली म्हणून प्यायलं सॅनिटायझर; 7 जणांचा मृत्यू, दोघं कोमात

पार्टीतली दारू संपली म्हणून चक्क लोकांनी सॅनिटायझर प्यायलं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. या घटनेमध्ये 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

पार्टीतली दारू संपली म्हणून चक्क लोकांनी सॅनिटायझर प्यायलं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. या घटनेमध्ये 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

  • Share this:
    मॉस्को, 22 नोव्हेंबर: कोणतंही व्यसन लागलं तर ते किती घातक ठरू शकतं याचा प्रत्यय रशियातील एका शहरात आला आहे. रशियाच्या तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावामध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. लोकांनी या पार्टीमध्ये प्रचंड मद्यपान केलं. त्यामुळे पार्टीमध्ये मागवलेली सगळी दारु संपली. पण पार्टीमध्ये आलेल्या लोकांची दारु पिण्याची हौस काही संपली नव्हती. दारु संपली म्हणून लोकांनी चक्क सॅनिटायझर प्यायलं. अर्थातच सॅनिटायझर प्यायल्यामुळे तिथे जमलेल्या अनेकांची तब्येत बिघडली. सॅनिटायझर प्यायल्यामुळे अनेक माणसं बेशुद्ध झाली. या घटनेमध्ये आत्तापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि 2 जणं कोमामध्ये गेली आहेत. या पार्टीमध्ये ज्या सॅनियाटझरचं सेवन लोकांनी केलं त्यात 69% मेन्थॉल होतं. डेली रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार,आजारी पडलेल्या लोकांवर याकुत्स्क या शहरामध्ये उपचार सुरू आहेत. दारु म्हणून सॅनिटायझर प्यायलेल्या लोकांची अनेकांची अवस्था गंभीर आहे. आता या पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं? सॅनिटायझर पिण्याची कल्पना कोणाच्या सुपिक डोक्यातून निघाली होती? त्याचा तपास पोलीस करत आहेत. लोकांनी प्यायलेल्या सॅनिटायझरमध्ये मेन्थॉलचं प्रमाण 69% होतं त्यामुळे त्या सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीचा तपासही पोलीस करत आहेत. या घटनेमुळे रशियाच्या तोमतोर गावामध्ये खळबळ माजली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: