इराणमध्ये विमान कोसळलं; 66 लोकांचा मृत्यू

इराणमध्ये विमान कोसळलं; 66 लोकांचा मृत्यू

एटीआर-७२ हे ट्विन इंजिन टर्बोप्रॉप विमान तेहरानहून यासूज विमानतळाकडे निघालं होतं. हे विमान इस्फहान प्रांतातून जात असताना या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यामुळे या विमानाचं सर्च ऑपरेशन सुरू झालं. त्यात या विमानाचे अवशेष मिळाले.

  • Share this:

18 फेब्रुवारी: इराणचं प्रवासी विमान दक्षिण इराण भागात कोसळलंय. हे विमान ६६ प्रवाशांना घेऊन निघालं होतं. सर्वच्या सर्व प्रवासी ठार झाल्याचं वृत्त रॉयटर्सनं या वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

एटीआर-७२ हे ट्विन इंजिन टर्बोप्रॉप विमान तेहरानहून  यासूज विमानतळाकडे निघालं होतं. हे विमान इस्फहान प्रांतातून जात असताना या विमानाचा रडारशी संपर्क तुटला.  त्यामुळे या विमानाचं सर्च ऑपरेशन सुरू झालं. त्यात या विमानाचे अवशेष   मिळाले.   सेमिरॉम शहराच्या हद्दीत डोंगराळ भागात हे विमान कोसळलं होतं.  हे ठिकाण तेहरानहून ६२० कि.मी. अंतरावर आहे.  हे विमान तेहरानहून यासूज चे ७८० कि.मी. अंतरावरील शहराकडे निघालं होतं. इराणीयन एअरलाइन्सचं हे विमान आहे. ज्या भागात हे कोसळलं तिथे दाट धुकं होतं. विमान कोसळण्याच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

गेल्या आठवड्यात रशियामध्ये असंच एक विमान कोसळलं होतं. त्यातही 70हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

First published: February 18, 2018, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading