Home /News /videsh /

आयुष्याचा जीवघेणा 'टर्निंग पॉईंट', डिलिव्हरी व्हॅन आणि सायकलच्या धडकेचा थरारक VIDEO

आयुष्याचा जीवघेणा 'टर्निंग पॉईंट', डिलिव्हरी व्हॅन आणि सायकलच्या धडकेचा थरारक VIDEO

नजर हटी दुर्घटना घटी तसाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

    लंडन, 04 जानेवारी : अनेकदा रस्त्यावर पुढे वळण आहे वाहान सावकाश चालवा असा बोर्ड किंवा सूचना लिहिलेली असते. हे वाचून किंवा जाणूनही आपलं आपल्या गाडीवर नियंत्रण ठेवलं जात नाही तर काहीवेळा समोरच्याच्या चुकीमुळे देखील अपघात घडत असल्याचा घटना समोर आल्या आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.एका वळणावर आयुष्याचा शेवट होता होता मृत्यूला हुल देऊन तरुण वाचल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तरुण Penny-farthing एका वेगळ्या प्रकारची उंच सायकल घेऊन रस्त्यावरून जात होता. त्याच दरम्यान त्याला वळायचं होतं आणि समोरून येणारा ट्रकही वळला आणि दोन्ही गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली. Penny-farthing ही सायकल दिसायला वेगळीच असते. पुढचं चाक मोठं आणि मागचं छोटं अशा पद्धतीची सायकल चालवणारा युवक अपघातानंतर जोरात खाली कोसळला आहे. हे वाचा-27 फूट महाकाय अजगरानं केला तरुणावर हल्ला, श्वास रोखून ठेवायला लावणारा VIDEO डीपीडी डिलिव्हरी ट्रकला ही सायकल धडकल्यानं भीषण अपघात झाला आहे. ही धक्कादायक घटना लंडनच्या रस्त्यावर घडल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नजर हटी दुर्घटना घटी तसाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. काही सेंकदाचा फरक आणि हा भीषण अपघात होतो. सुदैवानं या घटनेमध्ये सायकलस्वाराला गंभीर दुखापत झाली नाही. आतापर्यंत हा व्हिडीओ 21 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या