मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

रुग्णसेवा प्रथम कर्तव्य! Covid -19 उपचारासाठी या डॉक्टरांनी पुढील शिक्षणाला दिला विराम

रुग्णसेवा प्रथम कर्तव्य! Covid -19 उपचारासाठी या डॉक्टरांनी पुढील शिक्षणाला दिला विराम

भारतीय वंशाच्या या डॉक्टरांनी पूर्णवेळ कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे

भारतीय वंशाच्या या डॉक्टरांनी पूर्णवेळ कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे

भारतीय वंशाच्या या डॉक्टरांनी पूर्णवेळ कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे

  • Published by:  Meenal Gangurde
दुबई, 6 जून : कोविड – 19 विरुद्ध सुरू असलेल्या लढाईमध्ये पुढे जाऊन लढण्याचा निर्णय एका डॉक्टरने घेतला आहे. दुबई येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या या डॉक्टरांनी अल-वॉरसन हॉस्पिटॅलिटी आणि हेल्थकेअर सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी डॉक्टरेटचा अभ्यास (ऑर्थोपेडिक सर्जरी मधील डॉक्टर ऑफ मेडिसिन) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. 25 वर्षीय डॉक्टर कोविडवर उपचार करीत आहे 25 वर्षीय डॉ. आदित्य वर्मा हे मिलेनियम स्कूल दुबईचे माजी विद्यार्थी आहेत आणि 9 एप्रिलपासून अल वॉरसन सुविधा केंद्रात कोविड – 19 च्या रूग्णांवर उपचार करत आहेत. अल वॉरसन सेंटरमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांच्या कमतरतेबद्दल जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्याने स्वेच्छेने स्वत: ला तिथेच काम करण्याचे ठरविले. डॉ. वर्मा यांना यूएईच्या मोठ्या नेत्यांकडून मिळाली प्रेरणा डॉ. वर्मा यांचे म्हणणे आहे की, कोविड – 19 च्या संदर्भात युएईमधील मोठ्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना प्रेरणा मिळाली आहे. शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम, दुबईचे राजकुमार आणि दुबई कार्यकारी समितीचे अध्यक्ष ही त्यामधील काही नावे. वर्मा म्हणाले की, युएईच्या  राज्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते हे काम करीत आहे. डॉ. वर्मा यांनी खलिज टाईम्सशी बोलताना सांगितले की, ते शेख हमदानला यांना त्यांने केलेल्या कामांसाठी आभार व्यक्त करीत आहे. डॉ वर्मा मधुमेह आणि बीपी असलेल्या रुग्णांची काळजी घेत आहेत डॉ. वर्मा म्हणाले की, शेख हमदानने दुबईमध्ये फिल्डवर महत्त्वपूर्ण काम केलं आहे आणि आपल्या सर्व कामांबद्दल त्यांना प्रामाणिक भावना व्यक्त करावयाची आहे. डॉ. वर्मा म्हणाले की, ते दुबई हेल्थ अथॉरिटी (डीएचए) सोबत मधुमेह आणि उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांची काळजी घेतात आणि त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवतात. या बऱ्याच रूग्णांना ओटीपोटात आणि छातीत हळू वेदना होत असतात, पुढे हे दुखणे गंभीर होऊ शकतं. अशा परिस्थितीत, त्यांना अधिक वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे किंवा नाही आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे का हे पाहण्यासाठी आम्ही त्यांची तपासणी करतो. ते कोविड – 19 च्या संशयित रुग्णांसाठी तयार केलेल्या स्वॅबिंग टीमचा देखील भाग होते.
First published:

पुढील बातम्या