पॅरिसमध्ये हल्लेखोराने शिक्षकाचा गळा कापला, राष्ट्रपती म्हणाले, 'हा इस्लामिक अतिरेकी हल्ला'

पॅरिसमध्ये हल्लेखोराने शिक्षकाचा गळा कापला, राष्ट्रपती म्हणाले, 'हा इस्लामिक अतिरेकी हल्ला'

फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये शुक्रवारी एका तरुणाने शिक्षकावर चाकूने हल्ला करून शीर धडा वेगळे केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

  • Share this:

फ्रान्स, 17 ऑक्टोबर : फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये शुक्रवारी एका तरुणाने शिक्षकावर चाकूने हल्ला करून शीर धडा वेगळे केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे. तर आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

बीबीसी वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना पॅरिसच्या पूर्व-पश्चिम भागातील कन्फ्लान्स सेंट-होनोरिन नावाच्या शाळेजवळ ही घटना घडली आहे.  फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनीही हा इस्लामिक दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे.

हा हल्ला फ्रान्सच्या राजधानीच्या मध्यभागीपासून  वायव्य उपनगराच्या कन्फ्लान्स सेंट-होनोरिन येथे  असलेल्या शाळेजवळ संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्याचा प्रयत्न केला पण नंतर गोळीबार करण्यात आला. अजून हल्लेखोराचे नाव जाहीर झाले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हा 18 वर्षांचा मुलगा होता. ज्या शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. त्याने आपल्या विद्यार्थ्यांना पैगंबर मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र दाखवले होते. हे व्यंगचित्र  फ्रेच मासिक शार्ली अब्दोमध्ये प्रसिद्ध झाले होते.  हल्लेखोराला सापडलेल्या ओळखपत्रात त्याचा जन्म 2002 मध्ये मॉस्को येथे झाला असल्याचे समोर आले आहे.

हल्ल्यात मृत झालेला शिक्षक हे इतिहास हा विषय शिकवत होते. काही दिवसांपूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वर्गाच्या चर्चेचा भाग म्हणून  मोहम्मद यांचे  व्यंगचित्र दाखवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Published by: sachin Salve
First published: October 17, 2020, 9:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading