Home /News /videsh /

पालकांकडून मुलाचं Pornography Collection नष्ट; आता कोर्टाकडून नुकसान भरपाईचे आदेश

पालकांकडून मुलाचं Pornography Collection नष्ट; आता कोर्टाकडून नुकसान भरपाईचे आदेश

आई-वडिलांनी त्याचं पॉर्नोग्राफी कलेक्शन नष्ट केल्यानंतर त्या व्यक्तीने ही केस दाखल केली. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली असून पालकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.

  वॉशिंग्टन, 19 डिसेंबर : अमेरिकेतील एका व्यक्तीने चक्क आपल्या आई-वडिलांविरोधातच केस दाखल केली आहे. आई-वडिलांनी त्याचं पॉर्नोग्राफी कलेक्शन नष्ट केल्यानंतर त्या व्यक्तीने ही केस दाखल केली. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली असून पालकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. नुकसान भरपाईची रक्कम अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. 42 वर्षीय डेविड वर्किंगने दिलेल्या माहितीनुसार, तो ज्यावेळी घरी नव्हता, तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी $25,000 किंमतीचं पॉर्नोग्राफी कलेक्शन नष्ट केलं. ही बाब चुकीची असल्याचं सांगत न्यायालयाने पालकांना नुकसान भरपाई देण्याचं सांगितलं आहे. परवानगीशिवाय असं करणं चुकीचं - अमेरिकेतील (America) मिशिगनच्या (Michigan)न्यायालयाने डेविड वर्किंगने (David Werking) दाखल केलेली याचिका योग्य ठरवली आहे. पालकांकडून अशाप्रकारे परवानगीशिवाय पॉर्नोग्राफी कलेक्शन नष्ट करणं चुकीचं असून त्यांना आपल्या मुलाला नुकसान भरपाई द्यावी लागेल असं सांगितलं. डेविड, मिशिगन येथील ग्रँड हॅवन येथे, त्याचे आई-वडील बेथ आणि पॉल यांच्यासोबत राहत होता. मात्र, लग्नानंतर तो दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला होता. परंतु, 2016 मध्ये पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर डेविड पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे राहायला आला होता. घरी आल्यानंतर बेसमेंटमध्ये ठेवलेलं त्याचं सर्व पॉर्नोग्राफी कलेक्शन गायब झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. डेविडने याबाबत आपल्या पालकांशी चर्चा केली असता त्यांनी त्याला नीट उत्तर दिलं नाही. परंतु डेविडच्या सततच्या विचारणेनंतर त्याच्या वडिलांनी मेल करून त्याला पॉर्नोग्राफी कलेक्शन नष्ट केल्याचं सांगितलं. त्याच्या भल्यासाठी असं केल्याचंही त्याच्या वडिलांनी सांगितलं.

  (वाचा - घर भाड्याने देऊन वर्ल्ड टूरवर गेली महिला; भाडेकरुने घरातूनच कोटींनी मिळवलं उत्पन)

  डेविडच्या आई-वडिलांनी सांगितलं की, त्यांनी अधिकतर पॉर्न व्हिडीओ DVD नष्ट केल्या, परंतु त्यापैकी काही ठेवल्या. कारण त्यांच्या नजरेत त्या बेकायदेशीकर आहेत आणि त्यामुळे डेविडला शिक्षा होऊ शकते. परंतु पोलिसांनी, त्या व्हिडीओमध्ये असं बेकायदेशीर काहीही नाही, ज्यामुळे डेविडविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असं सांगितलं. आई-वडिलांविरोधात संतप्त डेविडने कोर्टात धाव घेतली आणि कोर्टानेही त्याच्या बाजूने निकालही दिला.

  (वाचा - भयंकर! वाघांचा लोकांवर हल्ला, एका उडीत तरुणावर घातली झडप, पाहा थरारक VIDEO)

  न्यायालयाने पालकांचा युक्तीवाद नाकारला - अमेरिकी जिल्हा न्यायाधिश पॉल मॅलोनीने आपल्या निर्णयात सांगितलं की, डेविडच्या पालकांना, डेविडचं पॉर्नोग्राफी कलेक्शन फेकण्याचा अधिकार नाही. ती त्यांच्या मुलाची संपत्ती आहे. मुलाच्या परवानगीशिवाय त्याची संपत्ती नष्ट करू शकत नाही. परंतु, डेविडच्या आई-वडिलांच्या वकीलाने, घराचे मालक म्हणून त्यांना अधिकार आहे की, त्यांच्या घरात पॉर्नोग्राफी सामग्री येऊ नये, असं सांगितलं. परंतु न्यायाधिश पॉल यांनी त्या युक्तीवादाकडे दुर्लक्ष करत, डेविडच्या बाजूने निकाल दिला.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Porn video

  पुढील बातम्या