पॅरेडाईज पेपर्स घोटाळा उघड; अमिताभ, जयंत सिन्हांसह 712 भारतीयांची नावं

पॅरेडाईज पेपर्स घोटाळा उघड; अमिताभ, जयंत सिन्हांसह 712 भारतीयांची नावं

  • Share this:

06 नोव्हेंबर:  पनामा पेपर्सपाठोपाठ आता पॅरेडाईज पेपर्स घोटाळा समोर आला आहे. या  घोटाळ्यात अमिताभ बच्चन, संजय दत्त यांची पत्नी मान्यता , केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा , नीरा राडिया अशा  714 भारतीयांचा समावेश आहे.

या पेपर्समध्ये तब्बल 1 कोटी 34 लाख कागदपत्र आहेत. या कागदपत्रांमध्ये बेनामी हिशोब,बेनामी मालमत्ता या सगळ्या तसंच इतर ब्लॅक इकोनॉमीची माहिती या पेपर्समध्ये आहे. 180 देशातील अनेक नामवंत हस्तींचा समावेश आहे. अमेरिकेत  इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने (आयसीआयजे) या संघटनेनं हे पॅराडाईज पेपर प्रसिद्ध केले आहे.  या यादीत अनेक आंतरराष्ट्रीय नेते आणि सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे.  ब्रिटीनची राणी एलिझाबेथ द्वितीय , कोलंबियन अध्यक्ष जॉन मॅन्युअल सांतो ,ख्यातनाम गायिका मॅडोना  अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प  यांच्या नावांचा या यादीत  समावेश आहे.

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या काही दिवस आधीच हा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात काही कंपन्यांचीही नावं उघड झाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 12:01 PM IST

ताज्या बातम्या