Home /News /videsh /

तालिबानसोबत शांततेनं तोडगा काढण्यासाठी पंजशीर तयार, चर्चेचा ठेवला प्रस्ताव

तालिबानसोबत शांततेनं तोडगा काढण्यासाठी पंजशीर तयार, चर्चेचा ठेवला प्रस्ताव

पंजशीरमध्ये (Panjshir) तालिबानला (Taliban) विरोध करणाऱ्या संघटनांनी आता शांतता तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

    नवी दिल्ली 06 सप्टेंबर : पंजशीरमध्ये (Panjshir) तालिबानला (Taliban) विरोध करणाऱ्या संघटनांनी आता शांतता तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, याच दरम्यान तालिबान, पाकिस्तान आणि अल कायदा यांच्या सततच्या हल्ल्यांमध्ये त्यांना सौहार्दपूर्णपणे तोडगा काढायचा आहे. सूत्रांनी रविवारी सीएनएन-न्यूज 18 ला ही माहिती दिली. तालिबानविरोधी मिलिशिया आणि तथाकथित माजी अफगाण सुरक्षा दलांनी बनलेले नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचे (एनआरएफ) लढाऊ ऑगस्टमध्ये काबूल ताब्यात घेतल्यापासून बंडखोरांसोबत लढत आहेत. (Afghanistan Crisis) तालिबान्यांचं सुपर मार्केट पाहिलं का? US सैन्यांच्या बंदूकांचीही करताहेत विक्री 'कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्ला सालेह आणि दिवंगत मुजाहिद्दीन कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद हे दहशतवादी गटाच्या विरोधात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याआधी, सालेह यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांना कट्टरपंथीयांनी केलेले "युद्ध गुन्हे" संपवण्यासाठी त्यांची संसाधने तातडीने गोळा करण्यास सांगितले. एका निवेदनात, सालेह मोठ्या मानवीय संकटाबद्दल बोलले. कारण हजारो लोक "तालिबानच्या हल्ल्यांमुळे विस्थापित झाले". सीएनएन-न्यूज 18 ने अलीकडेच वृत्त दिले, की पाकिस्तान तालिबानला विरोध करणाऱ्या संघनांविरोधात तालिबानला पाठिंबा देत आहे. एवढंच नाही तर पाकिस्तान तालिबानला हवाई सहाय्यताही देत ​​आहे. सूत्रांनी सांगितलं होतं की, तालिबानविरोधी सैन्याशी लढण्याऱ्यांच्या विरोधात विशेष फौज तयार करण्यात आली आहे. बॉम्बस्फोटानं हादरलं पाकिस्तान, तहरीक-ए-तालिबाननं स्वीकारली जबाबदारी मसूद रविवारी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, की त्यांना लढाई संपवायची आहे. बातचीत करून तोडगा काढण्यासाठीच्या प्रस्तावाचं स्वागत आहे. ते पुढे म्हणाले, की एनआरएफ सध्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि ही लढाई तात्काळ संपवण्यासोबतच बातचीत सुरू ठेवण्यासाठी सहमत आहे. बगलानमधील एका जिल्ह्याचा उल्लेख करत ते म्हणाले, की एनआरएफही या अटीवर ही लढाई बंद करण्यास तयार आहे, की तालिबाननं पंजशीर आणि अंदराबमधील हल्ले बंद करून या क्षेत्रातील आपल्या हालचाली थांबवाव्या.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या