Home /News /videsh /

पंजशीरचा लढा कायम! तालिबानला अवैध ठरवत स्वतंत्र सरकारची घोषणा

पंजशीरचा लढा कायम! तालिबानला अवैध ठरवत स्वतंत्र सरकारची घोषणा

तालिबानचं सरकार (Taliban Government) अवैध (Illegal) असून आपण स्वतचं कॅबिनेट (Cabinet) लवकरच घोषित करू, अशी घोषणा पंजशीरमधून (Panjshir) लढा देणाऱ्या एनआयएफनं (National Resistance Front) केली आहे.

    काबुल, 16 सप्टेंबर : अफणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवून तालिबाननं (Taliban) सत्ता स्थापन केली असली, तरी अद्याप पंजशीरने हार मानली नसल्याचं दिसून आलं आहे. तालिबानचं सरकार (Taliban Government) अवैध (Illegal) असून आपण स्वतचं कॅबिनेट (Cabinet) लवकरच घोषित करू, अशी घोषणा पंजशीरमधून (Panjshir) लढा देणाऱ्या एनआयएफनं (National Resistance Front) केली आहे. आपण पंजशीरवर ताबा मिळवल्याची घोषणा तालिबाननं केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र आपण अजूनही लढा देत असल्याचं एनआयएफनं जाहीर केलं आहे. नॅशनल रेझिस्टंट फ्रंट म्हणजेच नॉर्दर्न अलायन्सनं स्वतंत्र सरकारची घोषणा केली असून अहमद मसूद हे त्या सरकारचे प्रमुख असतील. शेवटच्या श्वासापर्यंत आपण तालिबानविरोधातील लढा सुरू ठेऊ, अशी घोषणा नॉर्दर्न अलायन्सनं केली आहे. त्याचप्रमाणे पंजशीरच्या पाठिशी उभे राहण्याचं आवाहन मसूद यांनी केलं असून तालिबानचं समर्थन करू नका, असं जाहीर आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटना, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, युरोप, सार्क यासारख्या संस्थांना अहमद मसूद यांनी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. पंजशीरचं आव्हान कायम तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असला, तरी पंजशीरवर त्यांना अद्याप पूर्ण ताबा मिळवता आलेला नाही. या ठिकाणी डोंगराळ भागातील नॉर्दर्न अलायन्सने सैनिक तालिबानी फायटर्सना टिपून मारत असल्याचं चित्र आहे. पंजशीरमधील काही भागात तालिबानी फायटर्स घुसले असून तिथे त्यांनी ताबा मिळवला आहे. मात्र त्यांना तिथून मागे रेटण्याचा प्रयत्न पंजशीरमधील सैनिक करत आहेत. आम्ही अद्याप हार मानली नसून तालिबानविरोधात आपला लढा सुरूच असल्याचं नॉर्दर्न अलायन्सनं म्हटलं आहे. हे वाचा - चीनमधील MEETOO Movement चा चेहरा असणाऱ्या महिलेचा कोर्टात पराभव दरम्यान, मंगळवारी तालिबाननं 33 मंत्र्यांच्या कॅबिनेटची घोषणा मंगळवारी केली होती. मुल्ला हसन अखुंद हे तालिबान सरकारचे पंतप्रधान असून मुल्ला बरादर हे उपपंतप्रधान आहेत. तर हक्कानी नेटवर्कचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban

    पुढील बातम्या