S M L

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे अमेरिकेच्या विमानतळावर उतरवले कपडे, व्हिडिओ व्हायरल

सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांची चक्क कपडे उतरवूण तपासणी करण्यात आली. यामुळे पाक मीडियामधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 28, 2018 09:36 AM IST

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे अमेरिकेच्या विमानतळावर उतरवले कपडे, व्हिडिओ व्हायरल

28 मार्च : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना वॉशिंग्टन विमानतळावर अतिशय अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांची चक्क कपडे उतरवूण तपासणी करण्यात आली. यामुळे पाक मीडियामधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. एखाद्या पंतप्रधानाची कपडे काढून तपासणी करण्याचा हा प्रकार कदाचित पहिल्यांदाच घडला असेल.

सध्या अमेरिका आणि पाकमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आणि त्यात आता या घटनेमुळे या संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होईल हे नक्की. अब्बासी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोक यावर आक्षेप व्यक्त करत आहेत.

असं सांगण्यात येतं आहे की, अब्बासी गेल्या आठवड्यात आपल्या आजारी बहीणीला भेटण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यांच्यासोबत हा प्रकार झाला. खरंतर पंतप्रधान भलेही त्यांच्या खासगी कामासाठी गेले होते, पण दरम्यान त्यांच्याकडे डिप्लोमेटिक पासपोर्ट होता. त्यात ते पाकिस्तानच्या 22 कोटी देशवासियांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे पाकिस्तानची घोरणं आणि त्यांचे हेतू कितीही चूकीचे असले तरी अमेरिकेने त्यांना अशी वागणूक देणं म्हणजे खूप वाईट आणि धक्कादायक बाब आहे.या घटनेवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होतं आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे हा नवा ठपका लागला असं म्हणायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2018 09:36 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close