पाकच्या सरकारी वेबसाईटवर चक्क भारतीय राष्ट्रगीत! हॅकर्सचा प्रताप

पाकच्या सरकारी वेबसाईटवर चक्क भारतीय राष्ट्रगीत! हॅकर्सचा प्रताप

न्यूज 18 च्या एका वृतांतानुसार पाकिस्तानच्या या सरकारी वेबसाईटची सेक्युरिटी तोडून त्यावर भारतीय स्वातंत्र्य दिनाचे संदेश आणि राष्ट्रगीत पोस्ट करण्यात आलं होतं. हे काम भारतातल्या हॅकर्सने केल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

  • Share this:

3 ऑगस्ट: एका हॅकर्सच्या ग्रुपने पाकिस्तानची www.pakistan.govt.pk सरकारी वेबसाईट काही काळ हॅक केली होती मात्र आता पाकिस्तान सरकारने या वेबसाईटवर पुन्हा ताबा मिळवला आहे. या वेबसाईटवर हॅकर्सनी भारताचं राष्ट्रगीतही पोस्ट केलं होतं. काही भारतीय साईट्सही चार महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे हॅक करण्यात आल्या होत्या.

न्यूज 18 च्या एका वृतांतानुसार पाकिस्तानच्या या सरकारी वेबसाईटची सेक्युरिटी तोडून त्यावर भारतीय स्वातंत्र्य दिनाचे संदेश आणि राष्ट्रगीत पोस्ट करण्यात आलं होतं. हे काम भारतातल्या हॅकर्सने केल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पण अजून कुठलीही ऑफिशियल बातमी आलेली नाही.

चार महिन्यांपूर्वी भारताच्या चार नामांकित शैक्षणिक संस्थांच्याही साईट्स अशाचप्रकारे हॅक करण्यात आल्या होत्या. आयआयटी बनारस, आयआयटी दिल्ली ,अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठ या चार विद्यापीठांच्या साईट्स हॅक करण्यात आल्या होत्या.त्यांच्यावर भारतविरोधी संदेशही हॅकर्सनी पोस्ट केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानने पाठिंबा दिलेल्या हॅकर्सने या साईट्स हॅक केल्या होत्या ज्यांचं नाव 'पाकिस्तान हॅकर्स क्रू' होतं.

(न्यूज 18)

First published: August 3, 2017, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading