कराची, 29 जून : पाकिस्तानचे चांद नवाब हे रिपोर्टर आठवतायत ना? गेल्या वर्षी ईदच्या सुमारास त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि आता दुसरा व्हिडिओ व्हायरल झालाय. यावेळचा तो व्हिडिओ आहे कराचीच्या पानाचा.
Chand Nawab rocks yet again but this time not for ‘apno mein Eid manane’ pic.twitter.com/6mgBMrr5bT
— Fazil Jamili (@faziljamili) 28 June 2018
हे चांद महाशय यावेळी उभे आहेत एका प्रसिद्ध पानांच्या दुकानात. आणि त्यांना त्या पानाची महती सांगायचीय. पण ते एकसारखं विसरतायत. गोंधळतायत. मध्येच दुकानातल्या विक्रेत्यांना सांगतायत, मी चॅनेलचं नाव घेतलं की मला पान द्या. आता इथे तर कसली गर्दीही नाही. त्यांना कुणी धक्केही देत नाही. तरीही ते अडखळतायत. पान आधी खावं की नंतर हाही संभ्रम त्यांना आहे. हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
गेल्या वर्षी चांद नवाब रेल्वे स्टेशनवर उभे राहून रिपोर्टिंग करत होते. त्यांचा तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला की बजरंगी भाईजानमध्ये नवाजुद्दीननं त्यांचीच स्टाइल उचलली होती.
हेही वाचा
VIDEO : कांदिवलीत नववीतल्या मुलीची आत्महत्या, आठव्या मजल्यावरून मारली उडी
घाटकोपर विमान अपघातात मृत्यू झालेल्या मारिया देशातल्या पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chand nawab, Paan, Pakistan, Reporter, चांद नवाब, पाकिस्तान, पान, रिपोर्टर