नवी दिल्ली, 26 मार्च : एका अनिवासी पाकिस्तानी (Pakistan) उद्योजकावर (fake vaccine) आपल्याच कंपनीतल्या कामगारांना नकली कोरोना लस दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मेक्सिकोत मोठा कापड उद्योग असणारा मूळचा पाकिस्तानी मोहम्मद युसूफ अमदानी ( Mohamad Yusuf Amdani fake corona vaccine) याने आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना रशियातून मागवलेली Sputnik V ही लस देतो असं सांगत खोटी कोरोना लस दिल्याचं वृत्त मेक्सिन वृत्तपत्र रिफॉर्माने दिलं आहे. (Mexican newspaper Reforma) आहे. या लसी रशियाहून मागवण्यात आल्या होत्या. वृत्तपत्रात त्याच्याविरोधात एक लेख छापून आल्यानंतर खळबळ उडाली. प्रायव्हेट जेटमध्ये या नकली लसी सापडल्या असून त्या जप्त करण्यात आल्याचं वृत्त आहे.
भारतासह जगभरात कोरोना (coronavirus) ने विळखा घातला आहे. तर पाकिस्तानला ही कोरोनाचा मोठा फटका बसला. आता एका पाकिस्तानी व्यक्तीने नकली कोरोना व्हॅक्सिन दिल्याचे आरोप होत आहेत. मोहम्मद युसूफ अमदानी हा टेक्स्टाईल (textile factory in Mexico) उद्योगाचा मालक आहे. मेक्सिकोत त्याची फॅक्टरी आहे. आणि तिथेच त्याने हे लसीकरण केल्याची बातमी मेक्सिकन वृत्तपत्राने दिली आहे.
मोहम्मद युसूफ अमदानी हा पाकिस्तानच्या श्रीमंत लोकांमधे गणला जातो. युसूफने रशियातून (sputnik v vaccine) स्पूटनिक व्ही ही लस मागवली होती, असं सांगण्यात येतं.
Explainer : भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट आली आहे का?
युसूफने ही लस केवळ कर्मचाऱ्यांनाचं नाही तर आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही दिली होती ज्यात कंपनीचे काही महत्त्वाचे अधिकारी आणि राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. 10 मार्च रोजी युसूफ ने ओशन व्ह्यू (ocean view) हॉटेल मधे आपल्या जवळच्या नातेवाईकांना ही लस दिली. त्यानंतर 15 रोजी त्याने स्वतःच्याच फॅक्ट्रीत कर्मचाऱ्यांना ही लस दिली होती.
'आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह का दिला?' संतप्त तरुणाचा आरोग्य सेविकेवर हल्ला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Pakistan