लग्न करून कसं वाटलं ?पाकच्या पत्रकाराचं स्वत:च्याच लग्नाचं लाईव्ह रिपोर्टिंग

लग्न करून कसं वाटलं ?पाकच्या पत्रकाराचं स्वत:च्याच लग्नाचं लाईव्ह रिपोर्टिंग

पण या साऱ्याला फाटा देत एका पत्रकाराने चक्क आपल्या लग्नात रिपोर्टिंग केलं. कहर म्हणजे या नवरदेव पत्रकाराने आपल्याच पत्नीला लग्नावरच प्रतिक्रिया विचारली.

  • Share this:

05 फेब्रुवारी: पत्रकाराचं आयुष्य हे प्रचंड धकाधकीचं असतं. रात्रंदिन पत्रकारासाठी युद्धाचा प्रसंग असतो. थंडीत गरमीत त्याला सगळ्याच परिस्थितीत काम करावं लागतं. पण या साऱ्याला फाटा देत एका पत्रकाराने चक्क आपल्या लग्नात रिपोर्टिंग केलं. कहर म्हणजे या नवरदेव पत्रकाराने आपल्याच पत्नीला लग्नावरच प्रतिक्रिया विचारली.

तर झालं असं या पाकिस्तानी पत्रकाराने प्रेमविवाह केलाय. त्याच्या लग्नाचं कव्हरेज त्याच्या चॅनलने ब्रेकिंग न्यूज म्हणून चालवलं. हा पत्रकार आपल्या वडिलांना विचारतो. तुम्हाला कसं वाटतंय. त्यानंतर चक्क आपल्या पत्नीलाच तिच्या भावना विचारतो. एवढंच नाही तर स्वत:चा उल्लेख मजनू म्हणून केला आहे. या पत्रकाराच्या या मॅरेज रिपोर्टिंग'चा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय.सोशल मीडियात याची भरपूर थट्टाही केली जाते आहे.

मुळात सत्य लोकांपर्यंत पोचवणं हे पत्रकारितेचं ध्येय असतं. त्यासाठी वणवण फिरून रात्रंदिवस काम करून पत्रकार बातमी मिळवत असतो. आपण पत्रकार झालो या आनंदात त्याने आपल्या लग्नाचं रिपोर्टींग करून उतावळा पत्रकार हातात बूम असाच काहीसा कहर केला आहे.

First published: February 5, 2018, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading