नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर: प्रत्येक बातमी सोप्या भाषेत सांगण्याचं काम टीव्हीवरचे न्यूज अँकर्स ( News anchors) करतात. नेहमीच्या ब्रेकिंग न्यूज वाचताना न्यूज चॅनेलमधले अँकर कधी थकत नाहीत आणि अडखळत नाहीत. बातमी सांगताना अँकर मोठमोठ्याने हसत असल्याचं कधीच पाहण्यात आलं नसेल; मात्र सध्या पाकिस्तानमधल्या ( Pakistan news anchor funny video) एका न्यूज अँकरचा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात विकासाच्या मुद्द्यांवर (development issues) चर्चा सुरू असताना कार्यक्रमात सहभागी झालेल्या तज्ज्ञ (expert) व्यक्तीचं बोलणं ऐकून अँकरला हसू फुटलं.
पाकिस्तानी महिला न्यूज अँकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा हसू आवरता येणार नाही. या शोमध्ये पाकिस्तानच्या विकासाबाबत चर्चा सुरू होती. तेवढ्यात शोमध्ये सहभागी झालेले तज्ज्ञ भारत आणि पाकिस्तानमधल्या केळ्यांच्या आकाराची तुलना करू लागले. या शोची एक व्हिडिओ क्लिप ( video clip) सोशल मीडियावर ( social media) व्हायरल होत आहे.
हा 54 सेकंदांचा व्हिडिओ @nailainayat नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये न्यूज अँकर अल्विना आगा शोमधले पाहुणे ख्वाजा नावेद अहमद यांच्यासोबत पाकिस्तानच्या विकास समस्यांवर चर्चा करताना दिसतेय. नावेद यांचं बोलणं ऐकून अँकर अल्विना आगा हिला हसू आवरता आलं नाही. तिला हसताना पाहून नावेद अहमददेखील हसायला लागले, असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या व्हिडिओ क्लिपला आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत, तर 4 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.
नेमकं काय घडलं ?
न्यूज अँकर अल्विना आगा शोमधले पाहुणे ख्वाजा नावेद अहमद यांच्यासोबत पाकिस्तानच्या विकास समस्यांवर चर्चा करीत होती. याच वेळी नावेद यांनी दोन्ही देशांतल्या विविध जातींच्या केळ्यांच्या आकाराबद्दल बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, 'पाकिस्तानच्या सिंध प्रातांत केळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते; पण इथल्या शेतकऱ्यांनी थोडंसं संशोधन करायला हवे. मुंबईची केळी खूप मोठी-मोठी असतात. एका खोलीत तिथली 6 केळी असली, तर अख्ख्या खोलीत त्यांचा सुगंध दरवळतो. ढाका इथली केळी आकाराने लांब असतात, तर पाकिस्तानमधल्या सिंध प्रातांमध्ये बोटाएवढ्या आकाराची केळी असतात.' हे सांगत असताना नावेद हातवारेदेखील करत होते.
And the winner is, Bombay 🍌 pic.twitter.com/wJB8lqzODa
— Naila Inayat (@nailainayat) November 1, 2021
पाकिस्तानातल्या एक उर्दू न्यूज चॅनेलवर सुरू असलेल्या शोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून त्यावर अनेक जण कमेंटसुद्धा करत आहेत. लाइव्ह शोमध्ये अशा पद्धतीने एखाद्या न्यूज अँकरला मोठमोठ्याने हसताना पाहून तुम्हालादेखील स्वतःचं हसू आवरणं शक्य होणार नाही!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Video viral