Home /News /videsh /

कहर! पाकिस्तानी खासदाराने 14 वर्षांच्या मुलीशी रचला निकाह; तिच्यापेक्षा वयाने आहे चौपट

कहर! पाकिस्तानी खासदाराने 14 वर्षांच्या मुलीशी रचला निकाह; तिच्यापेक्षा वयाने आहे चौपट

Pakistan MP Marries 14-Year-Old Girl From Balochistan: मौलाना सल्हाउद्दीन अय्युबी हे सध्या पन्नास वर्षांचे आहेत. ते स्वतः खासदार आहेत. पाकिस्तानी कायद्यानुसार 16 वर्षांहून कमी वयाच्या मुलीला कायद्याने विवाहाची मान्यता नाही. तसं केलं तर पालकांवर कारवाई होऊ शकते.

पुढे वाचा ...
    चित्राल (बलुचिस्तान), 23 फेब्रुवारी : अल्पवयीन मुला-मुलींवर (Juvenile) विविध प्रकारचे अत्याचार घडत असतात. जगभरात याबाबतची अनेक प्रकरणं सातत्यानं उघडकीला येत असतात. आता असंच एक प्रकरण आता पाकिस्तानमध्ये घडलं आहे. पाकिस्तान पोलीस (Pakistan police) सध्या एका प्रकरणात तपास करत आहेत. एका पाकिस्तानी खासदारानं 14 वर्षांच्या  मुलीशी लग्न केल्याचं हे प्रकरण आहे. मौलाना सल्हाउद्दीन अय्युबी असं या खासदाराचं (Pak MP) नाव आहे. एएनआयनं (ANI) याबाबतचं वृत्त दिलं आहे. मौलाना सल्हाउद्दीन अय्युबी हे जमैत उलेमा ए इस्लाम (JUI-F) या पक्षाचे नेते आहेत. आणि बलोचिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीचे सदस्यही (Member of National Assembly) आहेत. स्थानिक माध्यमांच्या (local media) हवाल्यानं वृत्त देताना 'पाक ऑबझर्व्हर'नं (Pak Observer) म्हटलं आहे, पोलिसांनी याप्रकरणात चौकशीचे आदेश (police has ordered probe) दिले आहेत. चित्रालमध्ये स्त्रियांच्या प्रश्नावर (woman issues) काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेनं (NGO) याप्रकरणी तक्रार दाखल केल्यावर हे चौकशीचे आदेश देण्यात आले. 'डॉन' वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, ही मुलगी जुघूर इथल्या गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलची (Government Girls High school) विद्यार्थिनी होती. इथं तिच्या जन्मतारखेची (birth date) नोंद आहे. ही जन्मतारीख 28 ऑक्टोबर 2006 अशी असून ती अजून विवाहयोग्य वयाची झालेली नाही हेच यावरून उघड होतं. मौलाना सल्हाउद्दीन अय्युबी हे सध्या पन्नास वर्षांचे आहेत असं पाकिस्तानी माध्यमांचं (Pakistani media) म्हणणं आहे. चित्राल पोलीस स्टेशनचे अधिकारी (police station officer) सज्जाद अहमद म्हणाले, काही दिवसांपूर्वी या संस्थेनं तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पोलीस मुलीच्या घरी गेले. मात्र मुलीच्या वडिलांनी तिचं लग्न झालं असल्याचं नाकारलं. आणि याबाबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्रही लिहून दिलं. हेही वाचा गलवान खोऱ्यातील चकमकीत आमचे 5 जवान मारले गेले, अखेर चीनने केलं मान्य या मुलीच्या वयाहून चारपट मोठ्या असणाऱ्या खासदारासोबत झालेला हा विवाह पाकिस्तानच्या कायद्यानुसार (Pakistan law) वैध नाही. कारण इथं 16 वर्षांहून कामे वयाच्या मुलीच्या विवाहाला कायद्यानुसार (marriage law) मान्यता नाही. असा विवाह करणाऱ्या पालकांनाही शिक्षेची तरतूद आहे. दरम्यान लोअर चित्रालच्या डीपीओ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, की मुलीच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना आश्वस्त केलं आहे, की मुलीला ते ती 16 वर्षांची होईपर्यंत सासरी पाठवणार नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pakistan

    पुढील बातम्या