Home /News /videsh /

भारताने ब्रिटनला चांगलाच धडा शिकवला, पाकिस्तानी मीडियाकडून मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक

भारताने ब्रिटनला चांगलाच धडा शिकवला, पाकिस्तानी मीडियाकडून मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक

भारत सरकारने ब्रिटनबाबत घेतलेल्या निर्णयाचं (Pakistani media praising Modi government’s decision regarding Britain) पाकिस्तानी माध्यमं भरभरून कौतुक करत असल्याचं चित्र आहे.

    लाहोर, 3 ऑक्टोबर : भारत सरकारनं ब्रिटनवरून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी (India tightens entry rules for Britain in India) कोरोनाबाबतचे नियम कडक केले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयाचं (Pakistani media praising Modi government’s decision regarding Britain) पाकिस्तानी माध्यमं भरभरून कौतुक करत असल्याचं चित्र आहे. भारत सरकारनं ब्रिटनवरून येणाऱ्या नागरिकांना RT-PCR चाचणी आणि 10 दिवस विलगीकरण सक्तीचं केलं होतं. ब्रिटननं भारताच्या लसीकरण सर्टिफिकेटला मान्यता न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरादाखल ब्रिटनने ही कारवाई केली होती. काय आहे प्रकरण? भारताने ब्रिटनहून येणाऱ्या नागरिकांसाठी नवे नियम तयार केले आहेत. त्यानुसार भारतात येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तासांत केलेली RT-PCR टेस्ट सक्तीची असेल. ही टेस्ट असल्याशिवाय देशात प्रवेशच दिला जाणार नाही. याशिवाय ही टेस्ट निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट दाखवल्यानंतरच देशात प्रवेश देण्यात येईल, मात्र त्यानंतर लगेच 10 दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहावं लागेल. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा RT-PCR टेस्ट करावी लागले आणि त्यानंतरच देशात प्रवेश देण्यात येणार आहे. 4 ऑक्टोबरपासून हे नवे नियम लागू होतील. ब्रिटनची प्रतिक्रिया भारताने नवे नियम जाहीर केल्यानंतर ब्रिटनकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारतातील कोव्हिशिल्ड लसीला ब्रिटन सरकारने मान्यता दिली असून कोविन सर्टिफिकेटला मान्यता देण्याबाबत विचार सुरू असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी भारताच्या निर्णयामागचं कारण ब्रिटनने आपातकालीन वापरासाठीच्या यादीत कोव्हिशिल्ड लसीचा समावेश केला आहे. मात्र भारतात लसीकरणानंतर दिल्या जाणाऱ्या cowin सर्टिफिकेटला मात्र मान्यता दिलेली नाही. म्हणजेच एखाद्या नागरिकाने जरी लसीकरण करून घेतले असेल तरी कोविन सर्टिफिकेटलाच मान्यता नसल्यामुळे भारतायांना ‘नॉट व्हॅक्सिनेटेड’ ठरवण्यात येणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Britain, Covid cases, India, Pakistan

    पुढील बातम्या