Home /News /videsh /

मोठी दुर्घटना! पाकिस्तानचं एफ-16 लढाऊ विमान कोसळलं

मोठी दुर्घटना! पाकिस्तानचं एफ-16 लढाऊ विमान कोसळलं

23 मार्चला पाकिस्तानमध्ये एअर शो होणार आहे. या शोसाठी हे लढाऊ विमान सराव करत होतं. त्या सरावादरम्यान ही दुर्घटना घडली.

    इस्लामाबाद, 11 मार्च : पाकिस्तान हवाई दलाचं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. इस्लामाबादजवळ ही दुर्घटना घडली. इस्लामाबाद इथे मोठा आवाज झाल्यानं खळबळ उडाली होती. धुराचे लोट आणि आग दिसल्यानं स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी लढाऊ विमान कोसळल्याचं लक्षात आलं. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान इस्लामाबादजवळील जंगलात कोसळलं आहे. वैमानिक वाचला की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 23 मार्चला पाकिस्तानमध्ये एअर शो होणार आहे. या शोसाठी हे लढाऊ विमान सराव करत होतं. त्या सरावादरम्यान ही दुर्घटना घडली. पाकिस्तानी हवाई दलानं या अपघाताबाबत मौन बाळगलं आहे. अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. दुर्घटनास्थळी परिसरात सध्या कुणालाही जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. पाकिस्तानी हवाई दल आणि स्थानिक पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. ही विमान दुर्घटना नेमकी कशी घडली यासंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला असावा याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या दुर्घटनेची माहिती पाकिस्तानी हवाई दलाकडून लपवली जात असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानचं एफ-16 विमान हे अमेरिकेकडून मिळालं होतं. मागच्या वर्षी भारताचे शूर वैमानिक अभिनंदन यांनी ह्या विमानानं केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं होतं आणि एफ 16 लढाऊ विमानाला पाडलं होतं.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Pakistan, Pakistan news

    पुढील बातम्या