VIDEO: पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढली, पत्रकाराचं थेट गाढवावर बसूनच रिपोर्टिंग

VIDEO: पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढली, पत्रकाराचं थेट गाढवावर बसूनच रिपोर्टिंग

पत्रकार थेट गाढवावर बसूनच रिपोर्टिंग करताना दिसत आहे. पाकिस्तानात गाढवांची संख्या का वाढली आहे, गाढव पाळणं लोकांना कसं फायदेशीर आहे, याबाबत हा रिपोर्टर माहिती देताना दिसत आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 19 डिसेंबर: पाकिस्तानात सध्या गाढवांची संख्या वाढली आहे. गमतीशीर बाब म्हणजे तिथल्या एका पत्रकारानं याचं रिपोर्टिंग चक्क गाढवावर बसूनच केलं आहे. कुमार विश्वास यांनी हा ट्विटरवर शेअर केला आहे.

कुमार विश्वास यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ एका चॅनलचा आहे. यामध्ये पत्रकार थेट गाढवावर बसूनच रिपोर्टिंग करताना दिसत आहे. पाकिस्तानात गाढवांची संख्या का वाढली आहे, गाढव पाळणं लोकांना कसं फायदेशीर आहे, याबाबत हा रिपोर्टर माहिती देताना दिसत आहे.सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक यावरून पाकिस्तानची चेष्टाही करत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या वेगळ्या रिपोर्टिंगची ही पहिलीच घटना नाही. याआधीही पाकिस्तानचे वेगवेगळे रिपोर्टर सोशल मीडियात चर्चेत आले होते.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात एका रिपोर्टने चक्क ट्यूबवर बसून रिपोर्टिंग केलं होतं. पावसाळ्यात तिथल्या रस्त्यांवर साचलेल्या पाण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रिपोर्टरने पाण्यात ट्यूबवर बसून रिपोर्टिंग केलं होतं.


VIDEO: कारखान्याने उसाचे 3 लाख दिलेच नाहीत, नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्याबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 05:35 PM IST

ताज्या बातम्या