ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; दोन जवान शहीद तर तीन स्थानिकांचा मृत्यू

ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; दोन जवान शहीद तर तीन स्थानिकांचा मृत्यू

देशभरात दिवाळीनिमित्त आनंद साजरा केला जात असताना LOC वरुन दु:खद बातमी समोर आली आहे

  • Share this:

श्रीनगर, 13 नोव्हेंबर : देशभरात दिवाळीनिमित्त आनंद साजरा केला जात असताना LOC वरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. LOC वरील बारामुल्ला येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात BSF अधिकारी सबइन्स्पेक्टर राकेश डोभाल शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबरोबरच आणखी एका जवानाला यात वीरमरण आलं.

याशिवाय कमलकोट आणि बालकूट येथील भागात 3 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय केरन सेक्टरमध्येही पाकिस्तान मोर्टारने बॉम्ब हल्ला करीत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आतापर्यंत पाकिस्तानकडून तीन भागांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. भाडीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमधील इझमार्ग भागात दुपारी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यानंतर पुढील काही मिनिटात कुपवाडा जिल्हात गोळीबार झाला.  पाकिस्तानी आर्मीने युरी सेक्टरमधील बारामुल्लाच्या दिशेने गोळीबार केला होता.

यावेळी बीएसएफच्या जवानांनीही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन जवानावा वीरमरण आलं. याशिवाय तीन स्थानिकांचाही मृत्यू झाला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं.

Published by: Meenal Gangurde
First published: November 13, 2020, 4:05 PM IST

ताज्या बातम्या