कराची 04 ऑगस्ट : पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये अगदीच बिकट (Pakistan Economy) झाली आहे. यामुळे देशातील महागाई तर वाढती आहेच, पण सरकारवरील आर्थिक ताणही वाढत आहे. तेथील परिस्थिती इतकी भीषण आहे, की सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही कर्ज काढावं लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लॉकडाऊनमुळे व्यापारही ठप्प झाला होता. यातच आता पाकिस्तानला इस्लामाबादमध्ये असलेलं आपलं अधिकृत पंतप्रधान निवासही भाडे तत्वावर (Pakistan PM residence on rent) देण्याची वेळ आली आहे.
2019 साली पाकिस्तान सरकारने पंतप्रधान निवासाचे रुपांतर विद्यापीठामध्ये (Pak PM residence university) करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांनी हे निवासस्थान सोडले होते. पण आता सरकारने याठिकाणी विद्यापीठ बनवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. समा टीव्हीच्या अहवालानुसार, विद्यापीठ बनवण्याऐवजी आता हे निवासस्थान भाडे तत्वावर (PM residence on rent) देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे निवासस्थान आता सांस्कृतिक, शैक्षणिक, फॅशन आणि अशा इतर कार्यक्रमांसाठी भाडे तत्वावर (Pakistan PM residence) उपलब्ध करण्यात येणार आहे. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
धुमसतं जम्मू-काश्मीर शांततेच्या वाटेवर? या कारणांमुळे दगडफेकीच्या घटनांत मोठी घट
पंतप्रधान निवास भाडे तत्वावर देण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी होणारे कार्यक्रम कशा प्रकारचे असतील हे पाहणे, तसेच या कार्यक्रमांदरम्यान सुव्यवस्था राखणे आणि पंतप्रधान निवासाचे डेकोरम मेन्टेन ठेवण्याचे काम या समित्या करतील. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान निवासामार्फत किती कमाई होईल याबाबत फेडरल मंत्रिमंडळ (Pak federal cabinet) लवकरच चर्चा करणार आहे. एकूण निवासस्थानापैकी दोन गेस्ट विंग्स आणि लॉन हे भाग भाड्याने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी आता उच्चस्तरीय डिल्पोमॅटिक कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय सेमिनार आयोजित केले जातील.
कर्कश आवाजासह नियमांचा फज्जा; संसदेपासून 500 मीटरवर बारबालांचा धांगडधिंगा
इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळतानाच असं म्हटलं होतं, की सरकारकडे लोककल्याणासाठी आवश्यक योजना राबवण्याइतके पैसेच नाहीत. इम्रान हे सध्या बानी गाला (Imran Khan residence) या निवासस्थानी राहत आहेत. पाकिस्तानच्या बिकट अर्थव्यवस्थेचा परिणाम देशातील महागाई दरावर (Pakistan Inflation rate) झालाय. या वर्षीच्या मे महिन्यात पाकिस्तानमधील महागाई दर हा तब्बल 10.9 टक्क्यांवर होता. त्यातच आता चक्क पंतप्रधान निवासच पैसे मिळवण्याच्या दृष्टीने भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातूनच पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती डबघाईला आली आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pak pm Imran Khan, Pakistan