'सर मेरे सामने गोलियाँ चल रहीं है!' पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवरच्या हल्ल्याचा LIVE VIDEO

'सर मेरे सामने गोलियाँ चल रहीं है!' पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवरच्या हल्ल्याचा LIVE VIDEO

Pakistan Stock-Exchange वर झालेल्या या हल्ल्यात 4 दहशतवादी ठार झाले असल्याचं पोलीस सांगत आहेत. किमान 5 नागरिकांंचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा LIVE video घटनेनंतर काही क्षणात सोशल मीडियावर आला.

  • Share this:

कराची, 29 जून : पाकिस्तानात (pakistan terror attack) सोमवारी सकाळीच देशाच्या महत्त्वाच्या आर्थिक केंद्रावर (Pakistan Stock Exchange) म्हणजे कराची (Karachi) स्टॉक एक्सचेंजवर सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. पुढच्या काही क्षणांत तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीने शूट केलेला VIDEO सोशल मीडियावर आला आणि खळबळ उडाली.

पाकिस्तान शेअर बाजाराच्या इमारतीत 4 दहशतवाही घुसले आणि त्यांनी थेट गोळीबार सुरू केला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 4 दहशतवादी ठार झाले असल्याचं पोलीस सांगत आहेत. किमान 5 नागरिकांंचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा LIVE video घटनेनंतर काही क्षणात सोशल मीडियावर आला. 'इमारतीतून गोळ्यांचे आवाज येताना या VIDEO त स्पष्ट ऐकू येत आहे', असं व्हिडीओ शूट करणारा कुणाला तरी फोनवर सांगतो आहे, 'सर मेरे सामने गोलियाँ चल रहीं है, अभी अंदर घुस गएँ है, सबको बता दे प्लीज' असं सांगणारा हा VIDEO Twitter आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इमारतीवर हल्ला झाला आहे. कुणाला तिथे जाऊ नका म्हणून सांगा. मेरे सा'

पाकिस्तानातल्या या मोठ्या दहशतवादी हल्ल्यामागे कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस आणि रेंजर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अद्यापही चकमक सुरू आहे.

गलवान खोऱ्यात किती चिनी सैनिकांचा झाला मृत्यू? सरकार गप्प; कुटुंबीय संतापले

मीडिया रिपोर्टनुसार, कराची स्टॉक एक्सचेंज सकाळी 10.30 वाजता उघडतं. आजही रोजच्या वेळेत सुरू झालं. याचवेळी सर्वसामान्य लोकं आणि कर्मचारी दाखल होताच दहशतवादीही तिथे पोहोचले. क्षणात घटनास्थळी पळापळ सुरू झाली. तात्काळ याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

संकलन - अरुंधती

First published: June 29, 2020, 12:12 PM IST

ताज्या बातम्या