Home /News /videsh /

पाकिस्तानात सरकारची मनमानी! आज 3 वाजेपर्यंत सर्व सोशल मीडिया साइट्स बंद

पाकिस्तानात सरकारची मनमानी! आज 3 वाजेपर्यंत सर्व सोशल मीडिया साइट्स बंद

पाकिस्तान सरकारने (Pakistan Government) सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने आज शुक्रवारी देशातील सर्व सोशल मीडिया सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    इस्लामाबाद, 16 एप्रिल: पाकिस्तान सरकारने (Pakistan Government) सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने आज शुक्रवारी देशातील सर्व सोशल मीडिया सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने याबाबत घोषणा केली आहे. (Pakistan shuts social media sites till 3pm). पाकिस्तानातील अनेक सोशल मीडिया युजर्सनी सरकारच्या या  निर्णयाचा निषेध केला आहे. सरकारवर असा आरोप करण्यात येत आहे की, ठोस कारणं न देता पाकिस्तान सरकारने असा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने PTA (Pakistan Telecommunication Authority) ला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,  देशातील ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook), व्हॉट्सअ‌ॅप (WhatsApp), यूट्यूब (YouTube) आणि टेलिग्राम (Telegram) ब्लॉक करण्यात यावा. त्यानुसार या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अ‌ॅक्सेस शुक्रवारी 16 एप्रिल रोजी 11 ते 3 या वेळेत ब्लॉक करण्यात येत आहे. मंत्रालयाने PTA चेअरमनना याबाबत पत्र लिहिल्यानंतर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे. या पत्रामध्ये 'Most Immediate' अर्थात सर्वात त्वरित हे लागू करण्याबाबत नमुद करण्यात आले आहे. (हे वाचा-अवघडच आहे! महिला जेलर पडली कैद्याच्या प्रेमात; आता तिचीही झाली तुरुंगात रवानगी) द न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. मीडिया अहवालाना PTA च्या सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी काही सोशल मीडिया अ‌ॅप्लिकेशन्सवरील अॅक्सेस तात्पुरता प्रतिबंधित करण्यात आला आहे. ANI या वृत्तसस्थेच्या वृत्तानुसार, गृहखात्याने जिओ न्यूजला अशी माहिती दिली आहे की, त्यांच्या आदेशावरूनच PTA ने असा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे प्रतिबंध आणण्याची थेट कारणं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आली नाही आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Facebook, Pakistan, Social media, Twitter, Whatsapp, Youtube

    पुढील बातम्या