S M L

हेरगिरी प्रकरणात कुलभूषण जाधवला पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

हेरगिरी प्रकरणात कुलभूषण जाधवला पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2017 05:19 PM IST

हेरगिरी प्रकरणात कुलभूषण जाधवला पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

10 एप्रिल : हेरगिरी प्रकरणात कुलभूषण जाधवला पाकिस्तानच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलीये. बलुचिस्तानमधून कुलभूषण जाधवना अटक करण्यात आली होती. घातपाती कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कुलभूषणला अटक करण्यात आली होती. मात्र, चौकशी योग्य रितीने झाली नसल्याचा भारताचा दावा आहे.

भारतीय नागरिक असलेले कुलभषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपांखाली पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. आता त्यांना पाकिस्तानमधल्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलीय. गेल्या मार्चमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी जाधव यांना बलुचिस्तानातून अटक केली होती. ते भारतीय नौदलातले अधिकारी आहेत आणि त्यांना रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेत नेमण्यात आल्याचा दावा पाकने केला होता.

पाकिस्तानात घातपाती कारवायांचा कट रचल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. जाधव यांनी पूर्वी भारतीय नौदलात काम केलंय आणि त्यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतलीय. मात्र त्यांचा सरकारशी काही संबंध नसल्याचे भारताने स्पष्ट केलं होतं. असं असतानाही कुलभूषण जाधव यांना पाक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलीय.कुलभूषण जाधव यांच्याबद्दलचे पुरावे न देता कोर्टानं ही शिक्षा सुनावलीय, असं भारताने म्हटलंय. याविरुद्ध आवाज उठवण्याचं भारताने ठरवलंय.  पाकिस्ताननं कुलभूषणचा एक व्हिडिओही रिलीज केलाय. हा व्हिडिओही भारतानं फेटाळलाय.जाधव यांची लष्करी कोर्टात सुनावणी आहे याची कोणालाच माहिती नव्हती.

IBN लोकमतचे सवाल

कुलभूषण जाधव यांची सुनावणी कोर्टाऐवजी गुप्तपणे का झाली?

Loading...

कुलभूषण यांना फाशी देण्यासाठी पाकिस्तानला इतकी घाई का?

पाकिस्तानला पुरावे नष्ट करायचे आहेत का?

जाधव विरोधात काहीही पुरावे नसल्याचं सरताझ अझीझ यांनी का सांगितलं होतं?

पाकिस्तानला पुरावे नष्ट करायचे आहेत का?

जाधव विरोधात पुरावे नसल्याचं सरताझ अझीज यांनी का सांगितलं होतं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 04:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close